शिक्षणमंत्री केसरकर:आर पी डी हायस्कूल येथे माजी शिक्षकांचा केला गौरव
⚡सावंतवाडी ता.२५-: शाळेची जुनी आठवण ठेवून आज तुम्ही एकत्र आलात हे खरच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान या शाळेची भरभराट होत असताना ते येऊन बघणं व कौतुक करणं हा देखील एक जीवनातील आनंदाचा क्षण असतो असे गौरवोद्गार देखील श्री. केसरकर यांनी काढले. येथील आरपीडी हायस्कूलमध्ये माजी शिक्षकांचा गुणगौरव सत्कार श्री.मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंत्री केसरकर पुढे बोलताना म्हणाले की माजी विद्यार्थ्यांचा नेहमीच आपल्या शाळेला हातभार लागलेला असतो. ती परंपरा त्यांनी अशीच कायम सुरू ठेवावी असे आवाहन देखील श्री केसरकर यांनी यावेळी केले. तसेच जसे आपण घराला महत्त्व देतो तसेच आपण आपल्या शाळेला महत्व देऊन पुढील काळात आपल्याला काम अधिक करायचं आहे असे आवाहन श्री केसरकर यांनी केले.

दरम्यान येत्या पाच डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा महाराष्ट्रात आपण शुभारंभ करतोय ,असे केसरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. आज कॉम्पिटिशन जरी असलं तरी ती शाळा अधिक सुंदर होईल याची आपण अपेक्षा करतो असे देखील श्री केसरकर यावेळी म्हणाले.
