मुळदे येथे कार्तिक स्वामी दर्शन सोहळा २६ व २७ नोव्हेंबर रोजी…

⚡कुडाळ ता.२३-: कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान या नवनाथ उपासक प. पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या तपोभूमीत कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येणार आहे. कार्तिक शुक्ल चतुर्दशी (त्रिपुरारि पौर्णिमा) रविवार, २६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजून १४ मिनिटांपासून ते सोमवार, २७ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंतच्या कालावधीत दर्शन घेता येणार आहे. सर्व भाविकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प. पू. घडशी महाराज यांनी केले आहे.

You cannot copy content of this page