हुमरमळा वालावल ग्रामपंचायतींवर आमदार वैभव नाईक यांचेच वर्चस्व…

सरपंचपदी अमृत देसाई तर उपसरपंचपदी रश्मी वालावलकर यांची निवड..

⚡कुडाळ ता.२४-: तालुक्यातील हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायत गेली कित्येक वर्षे अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना विकासनिधी मोठ्या प्रमाणात येत आहे. २०२३ च्या निवडणुकीत अतुल बंगे यांना शह देण्यासाठी भाजपची जिल्ह्यातील मंडळी ठाण मांडून होती. वारेमाप आश्वासने देऊन सुध्दा हुमरमळा गावातील नागरिकांनी अतुल बंगे आणि अर्चना बंगे यांच्या वरचा विश्वास ढळू दिला नाही.

त्याचे फलित आज पहायला मिळाले. सरपंच अमृत देसाई, उपसरपंच रश्मी रमाकांत वालावलकर यांची निवड झाली तर युवासेनेचे धडाडीचे आणि आमदार वैभव नाईक यांचे खंदे समर्थक मितेश वालावलकर हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. तर हेमांगी कद्रेकर, संजना संतोष गुंजकर या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येऊन पुन्हा एकदा गड काबीज करताच घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी सरपंच व उपसरपंच व सदस्य यांचा सन्मान उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी केला. यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, अर्चना बंगे, निखिल वालावलकर, भाऊ गुंजकर, सूर्यकांत कांबळी,शरद वालावलकर, प्रकाश परब, हेमंत कंद्रेकर, उमेश कानडे, वैभव मांजरेकर, मानसी वालावलकर रमा गाळवणकर,श्रीम नम्रता परब, अपूर्वा वालावलकर, प्रदीप राणे, नारायण राणे, रमाकांत वालावलकर, आपा आकलेकर, मेघनाथ वालावलकर, पपू दळवी, कांता माड्ये, नरेंद्र पेडणेकर, राहुल बंगे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page