उच्चवर्ग साहित्य वर्चस्वामुळे मराठी साहित्याचे नुकसान…
नितीन रिंढे:समाज साहित्य विचार संमेलनाला मदत करण्याची भालचंद्र मुणगेकर यांची ग्वाही.. ⚡कणकवली ता.१९-: उच्चवर्ग साहित्य वर्चस्वामुळे मराठी साहित्याचे नुकसान झाले असून यामुळेच पहिले शिवचरित्र, बुद्धचरित्र लिहिणारे सिंधुदुर्ग सुपुत्र इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या इतिहास लेखनाची उपेक्षा झाली. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणही घेता आले नाही. मात्र त्यांनी लिहिलेला इतिहास वस्तुनिष्ठ असून त्याची दखल अनंत काळ घ्यावी लागणार…
