माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचे वादविवाद स्पर्धेत सुयश…

⚡कणकवली ता.१९-: बिडवाडी शैक्षणिक संस्था संचलित बिडवाडी हायस्कूल बिडवाडी यांच्यावतीने आयोजित केलेल्या “आधुनिक शेती तंत्रज्ञान योग्य की अयोग्य ” या वादविवाद स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील उच्च माध्यमिक विभागातील कु.सानिका काळसेकर (इ.११ वी सायन्स) व कु.सोनिया जाधव (इ.१२ वी वाणिज्य) यांनी सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.


या यशस्वी विद्यार्थ्यांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष पी.डी.सावंत, सरचिटणीस शिवाजी सावंत, चेअरमन आर.एच.सावंत, मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page