आंबोली “मधाचे गाव” लवकरच घोषित…

खादी ग्रामोद्योग महामंडळ सभापती रवींद्र साठे:विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधा..

आंबोली,ता.१९: सिंधुदुर्गातील आंबोली गाव हे मधाचे गाव लवकरच घोषित करण्यात येणार आहे.पर्यटनाबरोबर येथील बचत गटामार्फत ग्रामीण अर्थकारण विकास झाल्यास महिलांची प्रगती, देशाची प्रगती होईल समृद्धी येईल विविध योजनांचा लाभ घ्या उमेद आणि महामंडळ मार्फत आवश्यक सहायता करण्यात येईल असे प्रतिपादन खादी ग्रामोद्योग चे सभापती(राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी आंबोलीत उदघाटन प्रसंगी केले.

आंबोली येथील मध विक्री उदघाटन प्रसंगी खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे, खादी ग्रामोद्योगचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप,जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री.कुरुंदवाडे,सरपंच सावित्री पालेकर,महाबळेश्वर येथील मधूबन संचालक दिग्विजय पाटील,क्षेत्रीय समन्वयक श्री.चाटे, ग्रामीण विकास प्रकल्प संचालक डॉ.उदय पाटील,उमेद चे जिल्हा व्यवस्थापक निलेश वालावलकर,उमेद च्या अधिकारी स्वाती रेडकर,श्री गवंडे,अभय भिडे,अर्चना भंडारी, समुदाय संसाधन व्यक्ती रोहिणी गुरव,वनिता गावडे, सीमा गावडे ,अनिता सावंत तसेच महिला बचतगट ग्रामस्थ उपस्थित होते. सातारा महाबळेश्वर मधील मांघर हे मधाचे गाव घोषित करण्यात आले आहे,कोल्हापूर मधील पाटगाव,पालघर मधील घोलवड हे मधाचे गाव घोषित करण्यात आले आहे. आंबोली हे सिंधुदुर्ग मधून मधाचे गाव घोषित करण्यात येणार आहे.सभापती रवींद्र साठे म्हणाले, पर्यटन बरोबर मधाचा आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना उपलब्द झाली आहे. बारा बलुतेदार साठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री उद्योजक योजना,मुख्यमंत्री उद्योग योजना अशा योजनांचा लाभ घ्या.महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला म्हणाल्या,८० हजार बचतगटाकडून 5 लाख पर्यंतचा माझा प्रवास आहे.महिलांनी सर्व योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधा.”

You cannot copy content of this page