सामंत बंधूंना खुश करण्यासाठी
शिंदे गटाने स्टेटमेंट देऊ नये…

पप्पू पुजारे:प्रमोद जठार खासदार हवे ही जनसामान्यांची इच्छा..

⚡कणकवली ता.१९-: प्रमोद जठार खासदार हवे ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नव्हे तर जनसमान्यांची इच्छा आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाताची बोटे मोजण्या इतका असलेला शिंदे गटाने फक्त सामंत बंधूंना खुश करण्यासाठी स्टेटमेंट देऊ नये असा टोला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष उर्फ पप्पू पुजारे यांनी लगावला आहे.

भाजपा नेते माजी आम. प्रमोद जठार हे खासदार व्हावेत ही आमची नव्हे तर सामान्य जनतेची इच्छा आहे. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ याची दखल घेऊन त्यांना नक्कीच लोकसभेची उमेदवारी देतील यात आम्हाला कोणतीही शंका नाही परंतु जनसंबंधीची मागणी म्हणून आम्ही प्रमोद जठार यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी करीत आहोत.
मालवणचे शिंदे गटाचे तालुकाप्रमुख राजा गावकर हे पक्षांतर्गत बंडाळीसाठी प्रसिद्ध आहेत. त्याचे दाखले त्यांनी वारंवार दिले आहेत. गावकर यांनी भाजपवर बोलताना पन्नास वेळा विचार करावा.लोकसभेच्या 14 तालुक्यात भारतीय जनता पार्टीची चांगली ताकद आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चितच लोकसभेला निवडून येईल.असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष उर्फ पप्पू पुजारे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page