⚡बांदा ता.१९-: बांदा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा १७०वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
स्वातंत्र्यपूर्व काळात १८डिसेंबर १८५३रोजी स्थापन झालेल्या शाळेला १७०वर्षे पूर्ण झाली असून या निमित्ताने शाळेचा१७०वा वाढदिवस साजरा करण्यात आला. बांदा केंद्र शाळा ही एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळख असून या शाळेतून शेकडो विद्यार्थी शिकून अनेक चांगल्या पदावर काम करत आहेत. बांदा गावचा ऐतिहासिक ठेवा म्हणून या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पाहिजे जाते.
बांदा गावच्या प्रथम नागरिक अपेक्षा नाईक व बांदा ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य , केंद्र प्रमुख संदीप गवस, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, सेवानिवृत्त शिक्षिका सरोज नाईक, अनुराधा धामापूरकर , शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत शाळेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून शाळा परिसरात १७०पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या.
यावेळी सरपंच अपेक्षा नाईक यांनी शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी सर्वांना लाडूचे वाटप केले.
बांदा नं.१केंद्रशाळेचा १७०वा वर्धापनदिन उत्साहात साजरा…
