Headlines

पळसंब येथे १ जुलै रोजी मालवण तालुकास्तरीय कृषिदिन व कृषि मेळावा

⚡मालवण ता.२७-:हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती मालवण व कृषि विभाग (राज्य शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, पळसंब येथे सकाळी १०.३० वाजता तालुकास्तरीय कृषिदिन व कृषि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती मालवणच्या सभापती…

Read More

करासवाड्यात बंद खोलीत आढळले बाप-लेकाचे मृतदेह…

⚡सावंतवाडी, ता. २७-: सोनुर्ली- जाधववाडी येथील जाधव कुटुंबातील बाप-लेकाचा मृतदेह म्हापसा-करासवाडा येथील बंद खोलीत सापडला. बाजूलाच आई अत्यवस्थ स्थितीत आढळली. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. ही सामूहिक आत्महत्या की घातपात, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.​अजय देऊ जाधव (वय ३८) आणि त्यांचा मुलगा अथर्व (वय ७) अशी मृतांची नावे…

Read More

रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी पोलीस दलाचा आदर्श उपक्रम…

कणकवली : “पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावताना अनेकदा रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय घनश्याम आढाव यांनी जवळून अनुभवली. त्या जाणिवेतून सेवानिवृत्तीपूर्वी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव कृतीतून दाखवून दिली आहे. हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे,” असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी काढले.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कणकवली…

Read More

धाकोरे शाळा नंबर एक मध्ये सहज योग शिबिर संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२७ -: आजची बदलती जीवनशैली व मोबाईलच्या जमान्यात मुलांना एकाग्रता वाढीस लावणे अभ्यासात सातत्य टिकवणे, खेळाविषयी व योगा विषयी आवड निर्माण व्हावी म्हणून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा धाकोरे नं १ येथे सहज योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या मार्गदर्शन वर्गासाठी डॉक्टर श्री. बुरुड ,अमृता कदम , सोनाली कांबळी शेखर कांबळी व श्री.कुंभार यांनी…

Read More

महा ई सेवा व आधार केंद्र चालकांचे १ जुलैला मुंबईत राज्यव्यापी धरणे आंदोलन…

⚡सिंधुदुर्ग दि.२७-: अखिल स्तरीय महा ई सेवा केंद्र व आधार केंद्र राज्य संघटनेच्या विविध मागण्यासाठी 1 जूलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे शासनाच्या चुकीच्या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधात राज्यव्यापी धरणे आंदोलन केले जाणार आहे. याबाबतचे निवेदन आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी देण्यात आले.महा ई सेवा केंद्र व आधार केंद्र यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी मांडूनही प्रलंबीत आहे….

Read More

कुडाळमध्ये २९ जूनलाअन्नसुरक्षा कायद्याबाबत मोफत मार्गदर्शन शिबीर…

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा पुढाकार.. ⚡​कुडाळ ता.२७-: बदललेले अन्नसुरक्षा नियम आणि खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्न व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी एका विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता ‘मराठा समाज हॉल’ येथे हे शिबीर होणार आहे.​या शिबिराला…

Read More

मळेवाड येथे चारचाकी वाहनाला अपघात…

निसरड्या रस्त्यामुळे गाडीला अपघात.. ⚡सावंतवाडी ता.२७-: मळेवाड प्राथमिक शाळे जवळील वळणावर आज दुपारी ३ च्या सुमारास दोडामार्ग वरून शिरोड्याच्या दिशेने एक चारचाकी पीकअप जात असताना वळणावर गाडी स्लीप होऊन अपघात घडला.मात्र केवळ दैवबलवत्तर म्हणून यातील तिन्हीही प्रवासी सुखरूप बाहेर पडले.यात गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सविस्तर वृत्त असे की,मळेवाड प्राथमिक शाळेच्या जवळील वळणावर गाडी…

Read More

पावसात व्यापाऱ्यांना विशाल परब यांची ‘आधाराची छत्री’…

मळेवाड, शिरोडा व रेडीतील लहान व्यावसायिकांना व्यावसायिक छत्र्यांचे वाटप; सेवाभावातून सामाजिक बांधिलकीचा संदेश.. ⚡वेंगुर्ला ता. २७-:“पावसापासून संरक्षण, सेवाभावातून समर्पण” या ब्रीदवाक्याला साजेसा सेवाभाव प्रत्यक्ष कृतीतून जपत महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांनी मळेवाड तिठा, शिरोडा बाजारपेठ व रेडी गणपती मंदिर परिसरातील लहान व्यापाऱ्यांना व्यावसायिक छत्र्यांचे वाटप केले. पावसाळ्यात रोजीरोटी कमावणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात…

Read More

शिल्पाग्राम परिसरातील खड्ड्यांवरून नगरसेवक संजू परब आक्रमक…

तात्काळ खड्डे बुजवा: दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण..? संजू परब यांचा सवाल; तर संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन.. सावंतवाडी ता. २७ :सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक संजू परब यांनी आज आपल्या प्रभागातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी शिल्पाग्राम परिसरात गॅस पाईपलाईन व पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले खड्डे अद्याप बुजविण्यात आले नसल्याचे त्यांच्या…

Read More

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी विशाल परब यांचा शिक्षणाला हातभार..

पेंडूर येथील श्री कुलदेव विद्यामंदिर जि.प. प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी मोलाची मदत; सुविधायुक्त वातावरणात शिक्षणाला मिळणार चालना.. ⚡वेंगुर्ल ता. २७-: विद्यार्थ्यांना सुरक्षित व चांगल्या वातावरणात शिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र भाजप युवा नेते विशाल परब यांनी पेंडूर येथील श्री कुलदेव विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी मोलाची मदत केली आहे. शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीची आवश्यकता लक्षात घेऊन…

Read More
You cannot copy content of this page