Headlines

धाकोरे -मातोंड येथील काजू बागायतीला आग…

रात्री दहाच्या सुमारास घडली घटना:काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान… ⚡बांदा ता.१२-: धाकोरे – जोसोली – मातोंड येथील माळरानावर अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना रात्री साडे दहाच्या सुमारास विद्युत प्रवाह स्पार्किंग होऊन आग लागल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान आग लागल्याचे कळताच, धाकोरे वसवाचे तळे तसेच जोसोली येथील ग्रामस्थांनी तत्काळ तेथे…

Read More

रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश…

नेरूर वाघचौडी प्रकल्पग्रस्त शेतकरी श्री.शाम गावडे सह ग्रामस्थ यांच्या मागण्या अखेर औद्योगिक विकास महामंडळाकडून मान्य.. ⚡कुडाळ ता.११-: शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी उद्योगमंत्री मा.ना.श्री.उदयजी सामंत ,शिवसेना नेते,सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नेरूर येथील वाघचौडी येथील श्री.शाम गावडे सह ग्रामस्थांनी दि.२६ जानेवारी रोजी उपोषणास बसले होते.ही बाब शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर…

Read More

प्रभाग क्रमांक ७ मधील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विकास कामांचा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शुभारंभ…

⚡देवगड ता.११-: देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मधील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विकास कामांचा शुभारंभ प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आला . प्रभाग क्रमांक ७ मधील देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या प्रभागातील दोन कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ श्रीफळ फोडून ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते…

Read More

दांडी येथे २० मार्च रोजी राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा…

⚡मालवण ता.११-: मालवण दांडी येथील श्री दांडेश्वर मंदिर येथे बाल दांडेश्वर मंडळातर्फे राज्यस्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा दि. २० मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १०,००० रू., ५००० रू., २५०० रू., १५०० रू., तसेच उत्तेजनार्थ १००० रू. ची दोन पारितोषिके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी यतीन आचरेकर ८४५९०२१०३३, सुयोग…

Read More

माळगाव येथील ऍड. कुलकर्णी विद्यालयाच्या सभागृहासाठी २० लाखांचा निधी…

⚡मालवण ता.११-: खासदार संजय राऊत यांच्या खासदार निधीतून, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून, माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी, माळगाव संचलित अॅड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल, माळगाव या विद्यालयाला सभागृह बांधकामासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर करून दिल्याबद्दल माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी, माळगावचे अध्यक्ष डॉ. संजय खोत,…

Read More

तुम्ही विकासाला साथ द्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही बांधील आहोत,..

महेश सारंग:३ कोटी ३ लाख ४० हजार रुपयांची विकास कामांची भूमिपूजन.. ⚡सावंतववाडी ता.११-: विश्वगुरू म्हणून नावलौकीक मिळविलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज देशाचा सर्वांगीण विकास होत आहे. राज्यातही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून विकासाचा झंजावात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या छोट्याशा गावातील रस्त्याला कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. भाजपमुळेच हे शक्य असून तुम्ही विकासाला…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयात कायदेविषयक मूल्यवर्धित अभ्यासक्रमाचे आयोजन…

⚡मालवण ता.११-: महिला दिनानिमित्त मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात महाविद्यालयातील महिला विकास कक्ष आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिलांविषयी कायदे’ या मूल्यवर्धित अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि महिलांना रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या कायद्यांची माहिती व्हावी या उद्देशाने दि. ११ ते…

Read More

उद्यापासून काम सुरु करण्याच्या आश्वासनाअंती निगुडे ग्रामस्थांनचे उपोषण मागे…

⚡सावंतवाडी ता.११-: निगुडे देवळीवाडी विहिरीपर्यंत रस्ता मजबुतीकरण काम मंजुर असतांनाही ठेकेराकडून काम सुरु केले जात नसल्याने निगुडे ग्रामस्थांनी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले. सदरचे काम करतांना कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता पोलिस बंदोबस्त देण्यात यावा असे पत्र गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी बांदा पोलिसांना दिल्यानंतर आणि उद्यापासून काम सुरु करण्याच्या आश्वासनाअंती हे उपोषण…

Read More

मळगाव येथे काजू बागायत आगीच्या भक्ष्यस्थानी…

लाखोंचे नुकसान : शेतकरी चिंतेत.. सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासलगत मळगाव व वेत्ये सीमेलगतच्या काजू बागायतीत सायंकाळी ४ च्या सुमारास लागलेल्या आगीत स्थानिक शेतकऱ्यांच्या काजू बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात विलास राऊळ, सुरेश राऊळ, संजय मोहन राऊळ, दिलीप परशुराम राऊळ यांच्या गावठी व कलमी काजू बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले…

Read More

प्रशासनाच्या माध्यमातून अधिकाधिक विकासात्मक गोष्टी साध्य करु शकतात…

निलेश राणे:निर्भय मत्स्य व कृषी उद्योजक महिला संघटनेच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡मालवण ता.११-:संघटीत होऊन तळागाळातील समाजाचा विचार करत आपण संघटनेच्या माध्यमातून फार मोठे पाऊल उचलले आहे. यात तुम्हाला यश मिळेल. आपण संघटीत असल्यास शासन प्रशासन माध्यमातून अधिकाधिक विकासात्मक गोष्टी साध्य करु शकतात असे प्रतिपादन भाजप नेते निलेश राणे यांनी आचरा येथे दिली. निर्भय मत्स्य व…

Read More
You cannot copy content of this page