तुम्ही विकासाला साथ द्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही बांधील आहोत,..

महेश सारंग:३ कोटी ३ लाख ४० हजार रुपयांची विकास कामांची भूमिपूजन..

⚡सावंतववाडी ता.११-: विश्वगुरू म्हणून नावलौकीक मिळविलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज देशाचा सर्वांगीण विकास होत आहे. राज्यातही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून विकासाचा झंजावात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या छोट्याशा गावातील रस्त्याला कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. भाजपमुळेच हे शक्य असून तुम्ही विकासाला साथ द्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही बांधील आहोत, अशी ग्वाही भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश सारंग यांनी दिली.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर सावंतवाडी कोलगाव निरुखे या रस्ता व कोलगाव निरुखे ग्रामीण मार्ग १७९ वरील पूलाचे बांधकाम यासाठी तब्बल ३ कोटी ३ लाख ४० हजार रुपये मंजूर करण्यात आले असून या दोन्ही कामांचे भूमिपूजन महेश सारंग यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाले. यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे महेश सारंग यांनी विशेष आभार मानले.

यावेळी कोलगाव सरपंच तथा भाजपचे युवा मोर्चा आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, चंदन धुरी, माजी सरपंच तथा कोलगाव शक्ती केंद्रप्रमुख संदीप हळदणकर, माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, ग्रामपंचायत सदस्य रोहित नाईक, आत्माराम चव्हाण, प्रणाली टिळवे, रसिका करमरकर, संयोगिता उगवेकर, आशिका सावंत, हेमांगी मेस्त्री, गाव अध्यक्ष विरेंद्र धुरी, महिला अध्यक्षा सुवर्णलता गावडे, युवा अध्यक्ष राकेश ठाकूर, चंद्रकांत म्हाडगुत, रामचंद्र करमळकर, विश्राम दळवी, दिपक सावंत, अक्षय वेंगुर्लेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी त्या रस्त्याच्या निर्मितीसाठी जमिनी देऊन योगदान देणारे सर्व शेतकरी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या कै. वृंदा सारंग, माजी सरपंच फ्रान्सिस डिसोजा यांचे विशेष आभार मानले.
विकासही कधीही पूर्ण न होणारी प्रक्रिया असून आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. कोलगाव साठी ४ कोटी ७८ लाखांची नळ योजना मंजूर झाली असून त्यामुळे पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विकासाला साथ द्या व विकासाच्या पाठीशी राहून आगामी निवडणुकांमध्ये विकासाला मत द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page