⚡मालवण ता.११-: खासदार संजय राऊत यांच्या खासदार निधीतून, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून, माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी, माळगाव संचलित अॅड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल, माळगाव या विद्यालयाला सभागृह बांधकामासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
हा निधी मंजूर करून दिल्याबद्दल माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी, माळगावचे अध्यक्ष डॉ. संजय खोत, माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी माळगावचे सेक्रेटरी तातू भोगले, अॅड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल, माळगाव अध्यक्ष अरुण भोगले यांनी आभार मानले आहेत.
सदर सभागृहाच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत १२ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता शाळेच्या आवारात होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
