उद्यापासून काम सुरु करण्याच्या आश्वासनाअंती निगुडे ग्रामस्थांनचे उपोषण मागे…

⚡सावंतवाडी ता.११-: निगुडे देवळीवाडी विहिरीपर्यंत रस्ता मजबुतीकरण काम मंजुर असतांनाही ठेकेराकडून काम सुरु केले जात नसल्याने निगुडे ग्रामस्थांनी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले. सदरचे काम करतांना कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता पोलिस बंदोबस्त देण्यात यावा असे पत्र गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी बांदा पोलिसांना दिल्यानंतर आणि उद्यापासून काम सुरु करण्याच्या आश्वासनाअंती हे उपोषण मागे घेण्यात आले.

जिल्हा वार्षिक योजना सन २२/२३ जनसुविधा अंतर्गत निगुडे देऊळवाडी येथे रस्त्याचे काम मंजूर आहे. मात्र हा रस्ता करण्यात आडकाठी आणण्यात येत होती. त्यामुळे रस्त्याचे काम ठेकेदाराकडून अद्याप पर्यंत चालू करण्यात आलेले नाही. सदर रस्ता वाहतुकीस पूर्णपणे अयोग्य आहे त्यामुळे वाडीतील गरोदर महिला, वयोवृद्ध नागरीक, शाळकरी मुले, यांना रस्त्यावरून प्रवास करत असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदरचा निधी खर्च करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत असून मुदतीत निधी खर्च न झाल्यास तो निधी परतून जाण्याची शक्यता आहे. रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत निगुडे सरपंच यांना अनेकदा विचारले असता त्यांच्याकडून काम सुरू करणेबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने निगुडे देऊळवाडी ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.

या उपोषणाची दखल घेत सायंकाळी उशिरा गटविकास अधिकारी श्री नाईक सदर काम सुरू करण्यासाठी बांदा पोलिसांना पत्र देत पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी केली तसे पत्र उपोषणकर्त्यांना दिले व तात्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी हे उपोषण मागे घेण्यात आले.सदर उपोषणास गुरुदास निगुडकर,माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, माजी सरपंच शांताराम गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा निगुडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश सावंत, योगेश केणी ग्रामपंचायत सदस्य रोणापाल, हनुमंत सावंत, विनया नाईक, कृष्णा निगुडकर, श्रीराम सावंत, गंधाली निगुडकर, महेश निगुडकर, सिद्धेश निगुडकर, सुभाष निगुडकर, अनंत निगुडकर, शुभांगी निगुडकर, मेघा सावंत, सुहासिनी निगुडकर, शशिकांत निगुडकर, वसंत निगुडकर, शुभांगी निगुडकर, आदिती आरोसकर, पार्वती सावंत, विनायक नाईक, शंकर सावंत, तुळशीदास गवंडे, अंकुश निगुडकर, प्रभाकर सावंत, दीपक निगुडकर, नितीन निगुडकर, महादेव सावंत, देविदास निगुडकर, दिपाली निगुडकर, शिवदास निगुडकर, शुभांगी सुभाष निगुडकर, प्रभाकर सावंत, महादेव सावंत, आदी निगुडे देवळीवाडी ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

You cannot copy content of this page