निलेश राणे:निर्भय मत्स्य व कृषी उद्योजक महिला संघटनेच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद..
⚡मालवण ता.११-:
संघटीत होऊन तळागाळातील समाजाचा विचार करत आपण संघटनेच्या माध्यमातून फार मोठे पाऊल उचलले आहे. यात तुम्हाला यश मिळेल. आपण संघटीत असल्यास शासन प्रशासन माध्यमातून अधिकाधिक विकासात्मक गोष्टी साध्य करु शकतात असे प्रतिपादन भाजप नेते निलेश राणे यांनी आचरा येथे दिली.
निर्भय मत्स्य व कृषी उद्योजक महिला संघटनेच्या आयोजित महिला मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी निलेश राणे बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, आचरा सरपंच जेरान फर्नांडीस,संदीप परब, शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, माजी सभापती निलिमा सावंत, निर्भय महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आकांशा कांदळगावकर, उपाध्यक्ष मनिषा जाधव, उपाध्यक्ष प्रतिक्षा सारंग, सचिव अपर्णा गोलतकर यांसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
यावेळी संघटनेच्या माणूसकीची भिंत या मदत केंद्राचे उद्घाटन निलेश राणे यांनी करून रोख स्वरूपात आर्थिक मदतही केली.
या मेळाव्यात मत्स्य योजनांबाबत सहाय्यक अधिकारी तेजस्विनी करंगुटकर, बचत गट योजनांची माहिती रविकिरण कांबळी, यांनी दिली. यावेळी होममिनिस्टर स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
