धाकोरे -मातोंड येथील काजू बागायतीला आग…

रात्री दहाच्या सुमारास घडली घटना:काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

⚡बांदा ता.१२-: धाकोरे – जोसोली – मातोंड येथील माळरानावर अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना रात्री साडे दहाच्या सुमारास विद्युत प्रवाह स्पार्किंग होऊन आग लागल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान आग लागल्याचे कळताच, धाकोरे वसवाचे तळे तसेच जोसोली येथील ग्रामस्थांनी तत्काळ तेथे धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने येथील काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी ही लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले .त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

You cannot copy content of this page