Headlines

राजेश जाधव यांना शासनाचा डॉ आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान…

⚡सावंतवाडी ता.१६-: ओटवणे येथील सामाजिक कार्यकर्ते गुंडू उर्फ राजेश सदाशिव जाधव यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत देण्यात येणारा यावर्षीचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा स्वच्छता तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. मुंबई नरिमन पॉईंट येथील जमशेद भाभा नाट्यगृह येथे आयोजित करण्यात…

Read More

वाफोली गावात विविध विकासकामांचा राजन तेली यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡बांदा ता.१६-: वाफोली गावात विविध विकासकामांचा शुभारंभ श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.वाफोली जि. प. शाळा नंबर १ च्या छप्पर दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन मधून १० लाख रुपये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजुर झाले आहेत. या कामाचा शुभारंभ माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.वाफोली मधली वाडी ते नदी पर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी…

Read More

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी मी सुद्धा इच्छुक…

विशाल परब:उमेदवारीसाठी कोणीही इच्छुक;पक्षाकडून जो उमेदवार देणार तो निवडून आणण्यासाठी मी माझी जबाबदारी ओळखून काम करणार.. ⚡सावंतवाडी ता.१६-: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी मी सुद्धा इच्छुक आहे तशा प्रकारची मागणी ही आपण पक्षाकडे केली आहे, उमेदवारीसाठी कोणीही इच्छुक असू शकतो त्यात काहीही गैर नाही मात्र पक्षाकडून जो उमेदवार निश्चित केला जाईल…

Read More

महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शिवसेना पक्षात असंख्य कार्यकर्त्यांचा जंबो पक्षप्रवेश…

सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत. यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश.. ⚡कुडाळ ता.१६-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर,श्री.किरण उर्फ भैय्याशेठ सामंत, यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून झाराप येथे शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.हा प्रवेश सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय आंग्रे,खजिनदार…

Read More

विशाल परब यांनी सावंतवाडी नवनिर्वाचित पोलीस निरीक्षकांची घेतली भेट…

⚡सावंतवाडी ता.१६-: येथील युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी आज सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी. तेजस माने प्रशांत पाटील विकास परब आदी उपस्थित होते.

Read More

बांदा -सावंतवाडी इन्सुली मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात….

एसटी बसला ट्रक व डंपर ने दिली जोरदार धडक: ट्रकच्या मोठ्या प्रमाणात नुकसान.. ⚡बांदा ता.१६-: बांदा सावंतवाडी मार्गावर इन्सुली सोहिरोबानाथ आंबीये मंदिर समोर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. उभ्या असलेल्या एसटी बसला पाठीमागून ट्रक व डंपरने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला.सावंतवाडी दोडामार्ग एसटी…

Read More

निलेश राणें मुळेच मी समाजकारणात…

विशाल परब:वाढदिवसानिमित्त निलेश राणे यांना दीर्घायुष्य लाभो.. ⚡सावंतवाडी ता.१६-: राजकारणात व समाजकारणात ज्यांच्यामुळे आम्ही घडलो त्या आदरणीय निलेश राणे यांचा वाढदिवस उद्या साजरा होत आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिल्या.

Read More

बांद्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

२८ दात्यांनी केले रक्तदान:बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते शुभारंभ.. ⚡बांदा ता.१६-: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा तसेच सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २८ दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उदघाटन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला…

Read More

तुळस जकात नाका येथे राष्ट्रवादीकाँग्रेस आयोजित क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ…

⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला तालुक्यातील तुळस जकात नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर यांच्या संकल्पनेतून आयोजीत राष्ट्रवादी चषक २०२४ चे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, सुरेश गवस, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष…

Read More

अडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघातून विनायक राऊत यांना विजयी करण्याचा निर्धार…

वाढदिवसानिमित्त असगणी येथील रामेश्वर मंदिरात करण्यात आला संकल्प अभिषेक:ठाकरे शिवसेनेचे आयोजन.. मालवण (प्रतिनिधी) रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघातर्फे ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी असगणी येथील रामेश्वर मंदिरात विजयी संकल्प अभिषेक करून येत्या निवडणुकीत खासदार राऊत यांना या जि. प. मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला….

Read More
You cannot copy content of this page