बांदा -सावंतवाडी इन्सुली मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात….

एसटी बसला ट्रक व डंपर ने दिली जोरदार धडक: ट्रकच्या मोठ्या प्रमाणात नुकसान..

⚡बांदा ता.१६-: बांदा सावंतवाडी मार्गावर इन्सुली सोहिरोबानाथ आंबीये मंदिर समोर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. उभ्या असलेल्या एसटी बसला पाठीमागून ट्रक व डंपरने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला.
सावंतवाडी दोडामार्ग एसटी बस याठिकाणी प्रवासी घेण्यासाठी उभी होती. त्याचवेळी पाठीमागून भरधावं वेगात आलेल्या ट्रकने एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्याचवेळी वेगात असलेल्या डंपर चालकाला वेग आवरता न आल्याने त्याने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने बस मधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.

You cannot copy content of this page