⚡बांदा ता.१६-: वाफोली गावात विविध विकासकामांचा शुभारंभ श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
वाफोली जि. प. शाळा नंबर १ च्या छप्पर दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन मधून १० लाख रुपये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजुर झाले आहेत. या कामाचा शुभारंभ माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
वाफोली मधली वाडी ते नदी पर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी डोंगरी मधून ७ लाख, जिल्हा नियोजन मधून १८ लाख असा एकूण २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ माजी सरपंच मारुती गवस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, मारुती गवस, सोसायटी चेअरमन सौ. धनश्री गवस, बबन गवस, तटांमुक्ती अध्यक्ष सतिश गवस, पोलीस पाटील आना गवस, जयदेव गवस, अनिल गवस, अजय गवस, देवस्थान प्रमुख हरी गवस, ग्रामपंचायत सदस्य मंजुळा शेगडे, साक्षी शिरोडकर, महेश गवस, सचिन सावंत, सुभाष गवस, भगवान गवस, सखाराम गवस, अकुंश गवस, दिलीप गवस, मुख्याध्यापिका सौ. देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकृष्ण गवस, मंगेश गवस, सखाराम गवस, उदय गवस, पप्पा सावंत, अर्जुन गवस, शांताराम गायकवाड, महादेव नाईक, प्राची गवस, विधी गवस, करिश्मा गवस, मधुरा गवस, साक्षी आईर, दिशा कांबळे, सावी गवस, सुजल गवस, मेघना गवस आदी उपस्थित होते.
वाफोली गावात विविध विकासकामांचा राजन तेली यांच्या हस्ते शुभारंभ…
