तुळस जकात नाका येथे राष्ट्रवादीकाँग्रेस आयोजित क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ…

⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला तालुक्यातील तुळस जकात नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर यांच्या संकल्पनेतून आयोजीत राष्ट्रवादी चषक २०२४ चे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, सुरेश गवस, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदिप पेडणेकर, तुळस सरपंच रश्मी परब, तुळस उपसरपंच सचिन नाईक, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, तालुका कृषी सेल अध्यक्ष शाम सुंदर राय,संदिप सातार्डेकर, तालुका उपाध्यक्ष सुभाष दळवी, माजी ग्रा. प. सदस्य बाबा राऊळ , विद्या मालकर, सुभाष तांडेल, आरोसकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सदर एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धा दि. १५ ते १७ या कालावधीत होणार असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या संघाला रोख रुपये २५ हजार व चषक तसेच उपविजेत्या संघास रोख रुपये १५ हजार रुपये व चषक देऊन गौविण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page