शिक्षक हृदयनाथ गावडे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर…
⚡मालवण ता.२५-: कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तेंडोली आवेरे येथील उपक्रमशील अष्टपैलु शिक्षक श्री.हृदयनाथ गावडे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम.एस.पी) चा राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिपक डवर, शिवराज सावंत, सौ.संपदा बागी, शितल देवरकर या जिल्हा निवड समिती प्रमुखांद्वारे गावडे यांची या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन निवड करण्यात आली आहे….
