दिपक केसरकरांची विनायक राऊत यांच्यावर जोरदार टिका; मी बाळासाहेबांच्या विचारांमुळे शिवसेनेत गेले..
⚡सावंतवाडी ता.२५-: ज्या माणसावर मी उपकार केले त्याला उपकाराची जाणीव नाही. त्यामुळे त्या माणसाला येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडी जनता उत्तर देईल, असा पलटवार मंत्री दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांच्यावर सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत केला.दरम्यान, कोकणातील विकासकामांचे श्रेय विनायक राऊत नारळ फोडून घेत आहेत. खरे तर यांनी काहीच केले नाही. मात्र, मी नारळ फोडणारा माणूस नव्हे, असा टोला मंत्री केसरकर यांनी विनायक राऊत यांना लगावला आहे.
यावेळी मंत्री दिपक केसरकर पुढे म्हणाले की मी येथे नसताना खासदार येथे येऊन माझ्यावर बरेच बोलले.मला त्यावेळी पवारसाहेबांची साथ सोडताना वाईट वाटले होते. पण मला माझा लढा सोडायचा नव्हता. मी बाळासाहेबांच्या विचारांमुळे शिवसेनेत गेलो. तुम्ही येथे येऊन काय केले ? माझ्याबाबत तुम्ही बोलू नका. पवारसाहेब बोलतील असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,रूपेश पावसकर आदी उपस्थित होते.
