⚡मालवण ता.२५-: रंगपंचमी खेळून मालवणच्या आडारी नदीपात्रात मित्रमंडळी समवेत आंघोळीसाठी उतरलेल्या देवेंद्र उर्फ दीपक जयदास वेंगुर्लेकर (वय 24) रा. आडारी, मालवण या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली देवेंद्र याच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालवण आडारी येथील काही युवक हे रंगपंचमी साजरी करून दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आडारी भागात असलेल्या नदीत आंघोळीसाठी उतरले होते त्यात देवेंद्र उर्फ दीपक जयदास वेंगुर्लेकर या युवकाचाही समावेश होता काही वेळात आंघोळ आटोपल्यानंतर देवेंद्रची मित्रमंडळी ही घरी जाण्यास निघाली असता त्यांना देवेंद्र हा तरंगताना आढळून आला तो काहीच हालचाल करत नसल्याने त्याच्या मित्रांनी त्याला पाण्याबाहेर काढून प्रसंगावधान राखीत 108 रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत मालवण पोलीसांना माहिती देण्यात आली असून अधिक माहिती व जबाब नोंद कार्यवाही पोलिसांकडून सूरू होती. ग्रामस्थ वं मित्र परिवार यांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.
फोटो : देवेंद्र वेंगुर्लेकर
