शिक्षक हृदयनाथ गावडे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.२५-: कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तेंडोली आवेरे येथील उपक्रमशील अष्टपैलु शिक्षक श्री.हृदयनाथ गावडे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम.एस.पी) चा राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिपक डवर, शिवराज सावंत, सौ.संपदा बागी, शितल देवरकर या जिल्हा निवड समिती प्रमुखांद्वारे गावडे यांची या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण पुरस्कार वितरण दि. १४ मे रोजी गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक येथे होणार आहे.

महाराष्ट्र शिक्षक पॅनल टीमच्या वतीने सिंधुदुर्ग निवड समिती प्रमुख शिवराज सावंत यांच्या हस्ते हृदयनाथ गावडे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक) पुरस्कार निवड पत्र व शाल देऊन गौरवण्यात आले.

हृदयनाथ गावडे हे उच्च विद्या विभूषित असून कीर्तन विशारद, गांधर्व महाविद्यालयाची गायन मध्यमा, पत्रद्वारा दासबोध अध्ययन समीक्षक या परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. हृदयनाथ गावडे यांना सन २०२१ मध्ये मालवण कथामालेचा शिक्षणतज्ज्ञ जी,टी.गांवकर सेवामयी शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.


मसुरे नं.१ शाळेत कार्यरत असतेवेळी तब्बल ४० प्रयोग केलेल्या मुलींचा दशावतारास श्री.गावडे यांची संगीत साथ लाभली होती. महाराष्ट्र शासनाच्या जीवन शिक्षण मासिकामध्ये त्यांनी अनेकदा लेखन केले असून विविध वृत्तपत्रात ललित लेखन व कविता लेखन सतत करत आले आहेत. गावडे हे एक कीर्तनकारही आहेत. विविध तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे. हृदयनाथ गावडे यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page