Headlines

राजे प्रतिष्ठानतर्फे आंबोलीत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना…

आंबोली,ता.२७: राजे प्रतिष्ठान तर्फे कामतवाडी येथे सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात करण्यात आला.रायगडाप्रमाणे याठिकाणी प्रतिकृती स्थापन करण्यात आली आहे. आंबोली कामतवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजे प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्सव तिथीनुसार करण्यात येतो.आज या ठिकाणी सिंहासनाधीश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना विधिवत करण्यात आली.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे,राजे प्रतिष्ठान अध्यक्ष उल्हास…

Read More

नगरपंचायत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन…

⚡कणकवली ता.२७-: कणकवली नगरपंचायतच्या सुमारे ५२ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्यातील पगार मिळाला नाही आहे.त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक हाल होत आहेत. याविरोधात नगरपंचायतचे सर्व कंत्राटी कर्मचारी एकवटले असून त्यांनी बुधवारी सकाळपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.कणकवली नगरपंचायतमध्ये एकूण ५२ कंत्राटी कर्मचारी आहेत. याच्यामध्ये कणकवली शहरांमध्ये सफाई कामगार आणि ट्रॅक्टर तसेच अन्य वाहनांवरील चालकांचा…

Read More

ऋतिक परब यांची सावंतवाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तालुका विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड…

⚡सावंतवाडी ता.२७-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक, राजकिय आणि विद्यार्थी क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेत ऋतिक परब यांची सावंतवाडी तालुका विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत नियुक्ती पत्र देखील देण्यात आले, यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम सौ.अर्चनाताई घारे-परब यांच्या…

Read More

खानोली-सुरंगपाणी विठ्ठल पंचायतनांत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.२७-: खानोली सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतनात आयोजित विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा विविध क्षेत्रातील सुमारे ५० जणांचा विठ्ठल रखुमाई देवस्थानचे व्यवस्थापक दादा पंडित यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.खानोली-सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतनात दि. २० व २१ रोजी विविध धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

Read More

जनतेच्या सामोरे जाताना लाज वाटत असल्याने केसरकरांची नाहक रुपेश राऊळांकडून बदनामी…

गुणाजी गावडे यांचा पलटवार: तुमच्या नेत्यांनी जिल्ह्यासाठी किती निधी दिला हे आदी जाहीर करा; आणि मगच आमने-सामने येण्याची भाषा करा… सावंतवाडी ता.२८-: तुमच्या नेत्यांनी कायच विकास केला नाही हे आता सिद्ध झाल्याने रुपेश राऊळ यांना कुठेतरी जनतेच्या पुढ्यात जाताना व सांगताना लाज वाटते. त्यामुळेच नाहक केसरकारांची बदनामी करून आपला स्वार्थ साधून कशी मत पदरात पडता…

Read More

आंबोली येथे आजपासून शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम…

प्रा. रूपेश पाटील यांचे शिवचरित्र व्याख्यान, राजे प्रतिष्ठानचे आयोजन… ⚡सावंतवाडी ता.२७-: तालुक्यातील आंबोली येथील राजे प्रतिष्ठान, कामतवाडी यांच्या वतीने तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळा २७ आणि २८ मार्चदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामतवाडी-आंबोली येथे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता. २७) सकाळी ९ वाजता कलशपूजन आणि मिरवणूक, मूर्ती अभिषेक, मूर्ती…

Read More

साटम महाराजांवरील आमची एकजूटच्या विशेषांकाचे प्रकाशन…

सीताराम गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे खेम सावंत भोसले यांनी काढले गौरव उद्गार ⚡सावंतवाडी ता.२७-: त्रेमासीक आमची एकजूट च्या वतीने सलग पंचवीस वर्षे सद्गुरू साटम महाराजांच्या जिवनकार्याचा आढावा घेणारा विशेषांक सीताराम गावडे व त्यांचे सहकारी प्रकाशित करीत आहेत व ही खऱ्या अर्थाने ईश्वरी सेवा आहे,महाराजांच्या जीवन कार्याची महती सर्व दूर पसरविण्यासाठी सीताराम गावडे यांची धडपड वाखाण्याजोगी…

Read More

विठू महाकाली देवीच्या पालखीचे सोनाळी येथे राजेशाही थाटात स्वागत…

वैभववाडी प्रतिनिधी     वैभववाडी तालुक्यातील रावराणे ईनामदार समाजाचे आराध्य दैवत मिळंद ता.राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील श्री विठू महाकाली देवीच्या  पालखीचे मंगळवारी वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथे आगमन झाले. याठिकाणी सोनाळी ग्रामस्थ व वैभववाडी तालुक्यातील रावराणे समाजाच्यावतीने भव्य दिव्य राजेशाही थाटात स्वागत करण्यात आले. सोनाळी येथील श्री पावणादेवी व श्री विठू महाकाली देवीच्या पालखीची भेट झाली. हा पालखी…

Read More

सावंतवाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहर कार्याध्यक्ष पदी राकेश नेवगी यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.२६-: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील नवनियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत, यामध्ये कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांच्या हस्ते राकेश नेवगी यांची सावंतवाडी शहर कार्याध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आणि नियुक्ती पत्र देखील देण्यात आले,यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम सौ.अर्चनाताई घारे-परब…

Read More

पर्यटन व्यावसायिकांसाठी २८ रोजी मालवणात कार्यशाळा…

⚡मालवण ता.२६-: जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, होम स्टे, ऍग्रो टुरिझम, रिसॉर्ट, रिक्षा व्यावसायिक, टुरिस्ट व्हेईकल व्यावसायिक क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे पर्यटन व्यावसायिकांची दि. २८ मार्च रोजी दुपारी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये युनिट्सचे निवास सर्वेक्षण निधी पोर्टल नोंदणीसाठी तसेच…

Read More
You cannot copy content of this page