⚡कणकवली ता.२७-: कणकवली नगरपंचायतच्या सुमारे ५२ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्यातील पगार मिळाला नाही आहे.त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक हाल होत आहेत. याविरोधात नगरपंचायतचे सर्व कंत्राटी कर्मचारी एकवटले असून त्यांनी बुधवारी सकाळपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
कणकवली नगरपंचायतमध्ये एकूण ५२ कंत्राटी कर्मचारी आहेत. याच्यामध्ये कणकवली शहरांमध्ये सफाई कामगार आणि ट्रॅक्टर तसेच अन्य वाहनांवरील चालकांचा समावेश आहे. नगरपंचायतच्या वतीने ठेकेदाराकडून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन दिलं जाते. मात्र फेब्रुवारी महिन्यातील वेतन आता मार्च महिना संपत आला तरीसुद्धा देण्यात आलेले नाही आहे. वारंवार मागणी करूनही ठेकेदार न कर्मचाऱ्यांच्या वेतन देणारी दुर्लक्ष केला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा पीएफचे पैसे वजा करून घेतले जातात. मात्र याचवेळी तेवढीच रक्कम ठेकेदारांना सुद्धा पीएफ मध्ये जमा करणे बंधनकारक असूनही ठेकेदार आपल्याकडील पीएफची रक्कम मात्र जमा करत नाही आहे त्यामुळे या विरोधात सुद्धा हे काम बंद आंदोलन आहे. जोपर्यंत आपला फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळत नाही आणि ठेकेदार त्याच्याकडील पीएफची रक्कम जमा करत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलनावरती ठाम असण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.
नगरपंचायत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन…
