आंबोली,ता.२७: राजे प्रतिष्ठान तर्फे कामतवाडी येथे सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात करण्यात आला.रायगडाप्रमाणे याठिकाणी प्रतिकृती स्थापन करण्यात आली आहे.
आंबोली कामतवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजे प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्सव तिथीनुसार करण्यात येतो.आज या ठिकाणी सिंहासनाधीश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना विधिवत करण्यात आली.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे,राजे प्रतिष्ठान अध्यक्ष उल्हास गावडे,प्रमुख गावकर श्रीकांत गावडे,शशीकांत गावडे,वसंत गावडे,प्रकाश(बाळा)गावडे, साबा गावडे, केंद्रप्रमुख रामा गावडे,बबन गावडे,काशीराम गावडे,ग्रामपंचायत सदस्य शंकर चव्हाण,तानाजी गावडे, राजे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य,महिला,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुवासींनी प्रत्येक घरातून कलश याठिकाणी आणले होते.उद्या या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.
