वेर्ले येथे यश प्राप्त ग्रामस्थांचा श्री देव बादेकार ग्रामविकास मंडळातर्फे सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.२७-: वेर्ले गावचे सुपुत्र व नुकतेच शासकीय परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता पदावर रुजू झालेले श्री भूषण राऊळ यांच्यासह श्रीदेव बादेकार ग्रामविकास मंडळ तर्फे उद्योजक श्री संदिप सावंत, उद्योजक श्री ज्ञानेश्वर सावंत, १४ वर्षा खालील वयोगटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड झालेली कु.स्नेहल राऊळ व कु.प्रांजल राऊळ, शिक्षण परिषद मुंबई आयोजित काव्यं गायन स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती कु.श्रावणी घोगळे, गिर्यारोहण, साहसी खेळ प्रशिक्षक, इतिहासप्रेमी व किर्तनकार श्री संदेश गोसावी यांचा वेर्ले येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री देव बादेकार ग्रामविकास मंडळ, वेर्ले तर्फे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमाला मंडळाचे सल्लागार श्री गोविंद लिंगवत, सामाजिक कार्यकर्ते श्री धोंडी राऊळ , डॉ.संजीव लिंगवत , श्री शंकर राऊळ भाटलेकर, श्री देव बादेकार ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री जानदेव लिंगवत आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री भूषण राऊळ यांनी बोलताना आपण अत्यंत हालाखीची आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती असूनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कठोर परिश्रमातून मिळवलेले यश आणि आपल्या कुटुंबातील पहिले शासकीय कर्मचारी म्हणून रुजू होत असताना अत्यंत आनंद होत आहे, असे सांगितले. तसेच श्री देव बादेकार ग्रामविकास मंडळाने हा सन्मान केल्याबद्दल मनस्वी आभार! व्यक्त केले. यावेळी प्रसाद गावडे, सुनील राऊळ, शरद राऊळ, प्रकाश मर्गज, चिन्मय जड्ये, संतोष राऊळ, विजय गोसावी, अशोक गोसावी, सुजित राऊळ, रविंद्र मेस्त्री, सुरेश गावडे, अनिल गावडे, संदिप राऊळ, मधुकर लिंगवत, कृष्णा राऊळ, विष्णुदास लिंगवत, लाडजी राऊळ, चंद्रकांत राऊळ, हरी घोगळे, मयुर सावंत, यशवंत घाडी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन संदेश गोसावी यांनी, स्वागत जानदेव लिंगवत यांनी तर आभार प्रदर्शन प्रसाद गावडे यांनी केले.

You cannot copy content of this page