खानोली-सुरंगपाणी विठ्ठल पंचायतनांत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.२७-: खानोली सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतनात आयोजित विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा विविध क्षेत्रातील सुमारे ५० जणांचा विठ्ठल रखुमाई देवस्थानचे व्यवस्थापक दादा पंडित यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
खानोली-सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतनात दि. २० व २१ रोजी विविध धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या पंचायतनांत धार्मिकता व अध्यात्मिकता वाढीसाठी विविधांगी स्वरूपांत प्रोत्साहन देणाऱ्या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या ५० जणांचा सत्कार त्यानिमीत्ताने करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांत देवस्थानचे व्यवस्थापक दादा पंडित महाराज, सत्कारमुर्ती साईप्रसाद नाईक, विश्वराज मिठबांवकर, राजू तावडे, अभिमन्यू लोंढे, राजाराम गावडे, विनायक गावडे, मिलींद पंडित यासह सत्कारमुर्ती व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page