प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी दोन्ही संशयितांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर…

ओरोस ता ८सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी देवगड येथील संशयित आरोपी प्रणाली माने आणि आर्य माने या दोघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांनी मंजूर केला आहे.सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण या विवाहित महिलेने आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्ये प्रकरणी…

Read More

सर्व्हर डाऊन ची पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी घेतली दखल…

संबंधित प्रशासनाला केल्या सूचना ; तात्काळ सर्व्हर सुरू:पालकांनी व विद्यार्थ्यांनी मानले पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाऑनलाईनचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे प्रतिज्ञापत्र व दाखले अपलोडींगचे काम ठप्प झाले होते. यासंदर्भात महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधत प्रतिज्ञापत्र वेळेत…

Read More

सेतू सुविधा केंद्रांचा सर्व्हर डाऊन…

शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल:कणकवली तहसीलदार कार्यालय येथे नागरिक व विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी मोठी गर्दी.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच सेतु सुविधा कार्यालयांमधील महाऑनलाईनचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे प्रतिज्ञापत्र व विविध प्रकारचे दाखले अपलोडींग करण्याचे काम ठप्प झाले आहे. महाविद्यालयीन शैक्षणिक प्रवेशासाठी विविध प्रकारचे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहेत. त्यामुळे नॉनक्रिमीलेअर, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात पडताळणी या दाखल्यांसाठी…

Read More

समुद्रातील बेपत्ता मच्छिमाराच्या शोधासाठी ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून द्यावा…

बाबी जोगी यांची मत्स्य विभागाकडे मागणी.. ⚡मालवण ता.०८-:मालवण शहरातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन एक मच्छिमार बेपत्ता झाला असून या बेपत्ता मच्छिमाराचा शोध घेण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाचा ड्रोन कॅमेरा उपलब्ध व्हावा व त्याद्वारे समुद्रात त्या बेपत्ता मच्छिमाराचा शोध घेण्यात यावा अशी मागणी मालवण मधील श्रमिक मच्छिमार संघांचे…

Read More

मालवण मेढा समुद्रात नौका पलटी ; दोन मच्छिमार बचावले, एक बेपत्ता…

मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन तीन मच्छीमार पाण्यात फेकले गेले. यात दोघेजण बचावले असून एक मच्छीमार बेपत्ता झाला आहे. स्थानिक मच्छिमारांकडून त्याचा समुद्रात शोध सुरू आहे. ही घटना आज पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालवण शहरातील मेढा जोशी वाडा येथील…

Read More

नॅबच्या ऑप्थाल्मीक व्हॅनचे गुरुवारी लोकार्पण…

सावंतवाडी : रोटरी क्लब सावंतवाडी व रोटरी क्लब सेंट सायमन इजलॅण्ड यु.एस.ए. रोटरी डिस्ट्रिीक्ट ८९२० याच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध झालेल्या नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंड च्या अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा नेत्र तपासणी वाहनाचा लोकार्पण सोहळा गुरूवार १० जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होत आहे. नॅब सिंधुदुर्गच्या ऑप्थाल्मीक व्हॅनचा लोकार्पण सोहळा होत असून या…

Read More

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलचे सुयश…!

⚡सावंतवाडी ता.०८-: दिनांक 3 व 4 जुलै रोजी वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या ठिकाणी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या मुलींच्या व मुलांच्या पंधरा व सतरा वर्षाखालील फुटबॉल संघाने यश संपादन केले आहे. या स्पर्धेत पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात शालेय संघाने द्वितीय क्रमांक तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात शालेय संघाने द्वितीय क्रमांक…

Read More

हुमरमळा-वालावल येथे १० जुलैला महत्वाची बैठक…

स्मार्ट मीटर आणि गवे रेड्यांकडून शेती नुकसानीवर चर्चा होणार:अतुल बंगे आणि अमृत देसाई यांचे उपस्थित राहण्याबाबत आवाहन.. कुडाळ : स्मार्ट प्रीपेड मिटर विरोधात आणि शेतीची नासधूस करणाऱ्या गवा रेड्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी १० जुलै सकाळी ११ वाजता वालावल-हुमरमळा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वीजग्राहक आणि शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी प…

Read More

गिरीश नाटेकर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन…

⚡बांदा ता.०७-: बांदा उभाबाजार येथील गिरीश गंगाधर नाटेकर (वय56) यांचे सोमवारी दि. 7 जुलै रोजी सकाळी साडेपाच वाजता गोवा बांबोळी येथे हृदयविकाराने दुःखद निधन झाले . दुपारी बांदा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,भाऊ,दोन विवाहीत बहीणी, वहिनी, पुतण्या असा परिवार आहे. ते पुर्वीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते, शिवसेना शहरप्रमुख होते तसेच…

Read More

आंबोली घाटात नियंत्रण सुटल्याने कारला अपघात…!

⚡आंबोली ता.०७-: आंबोली घाटात कारवरच नियंत्रण सुटल्याने गाडीचा अपघात झाला. यात सुदैवाने कोणाला मोठी दुखापत झाली नाही. मात्र, गाडीचे नुकसान झाले. नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला गेली.

Read More
You cannot copy content of this page