शिंदे शिवसेनेच्या सुधा कवठणकरांचा आरोंदात “डोअर टू डोअर” प्रचार…

सावंतवाडी ता.३१-: आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून सुधा कवठणकर यांचा जोरदार प्रचार सुरू असून त्यांनी निवडणूक रिंगणात जोरदार मुसंडी मारली आहे. डोअर-टू-डोअर प्रचाराच्या माध्यमातून त्या मतदारांपर्यंत थेट पोहोचत असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

येत्या नऊ फेब्रुवारी रोजी आपलाच विजय निश्चित असून गुलाल आमचाच उधळला जाणार, असा ठाम विश्वास यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page