मिलाग्रीस हायस्कूलच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण…

सावंतवाडी ता.३१-: उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीच्या वतीने श्रद्धांजली
मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक रे . फादर रिचर्ड सालदाना यांनी अजित दादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्राच्या एका महान नेतृत्वाला महाराष्ट्र मुकल्याची भावना प्रशालेचे मुख्याध्यापक रे .फादर रिचर्ड सालदाना यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page