भाजपने अन्याय केल्याने अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलो…

जितेंद्र गावकर:
माजगाव, वेत्ये व सोनुर्ली गावातील जनतेचा उस्फूर्तपणे पाठिंबा मिळत असल्याने माझा विजय हा निश्चित..

⚡सावंतवाडी ता.३१-:
ओपन उमेदवार असताना भाजपकडून ना.मा.प्र. प्रवर्गातील उमेदवार देत माझ्यावर अन्याय करण्यात आला. त्यामुळे मी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. मात्र हा निर्णय घेताना माजगाव, वेत्ये व सोनुर्ली या तिन्ही गावांतील नागरिकांशी चर्चा करूनच निवडणूक रिंगणात उतरलो असून जनता ‘रिक्षा’ या चिन्हावरच मतदान करून मला विजयी करेल, असा ठाम विश्वास माजगाव पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार जितेंद्र गावकर यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, माजगावातून ओपन चे चार उमेदवार असताना देखील पक्षाने त्या उमेदवारांना डावलून ना.मा.प्र.उमेदवार दिला. या अन्यायाविरोधात येथील जनता नक्कीच आवाज उठवेल व मला विजयी करून योग्य उत्तर देईल, असा मला विश्वास आहे.

या भागातील अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असून नागरिकांनी मतांच्या रूपाने आशीर्वाद दिल्यास रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून त्यांची परतफेड करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. मी स्वतः उद्योजक असल्याने रोजगाराच्या प्रश्नांची मला जाण आहे. निवडून आल्यानंतर या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्या परीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, घरोघरी भेटी देत मतदारांना पत्रके वाटून ‘रिक्षा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही जितेंद्र गावकर यांनी यावेळी जनतेला केले.

You cannot copy content of this page