अपक्ष उमेदवार अमय पै यांचा निर्धार:आम्ही इस्त्रीचे कपडे घालून भाषण करणारे नाही, तर तळागाळात जाऊन काम करणारा व्यक्ती आहे..
⚡सावंतवाडी ता.३१-:
मी जिंकू किंवा हरू, मात्र शेवटपर्यंत लोकांसाठी लढत राहणार आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला असल्यानेच मला लोकांचा आशीर्वाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमय पै यांनी आज येथे व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, मी स्थानिक उमेदवार असल्याने मतदार मला आशेने पाहत आहेत. आज मी एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवत असून, स्थानिक उमेदवार म्हणून जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा मला विश्वास आहे. आम्ही इस्त्रीचे कपडे घालून भाषण करणारे नाही, तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष काम करणारे लोक आहोत. आमची नाळ प्रत्येक घराशी जोडलेली आहे.
याच विश्वासाच्या बळावर जनता ‘नारळ’ या निवडणूक चिन्हासमोर बटण दाबून मला भरघोस मतांनी विजयी करेल, असा ठाम विश्वास अमय पै यांनी यावेळी व्यक्त केला.
