उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना उद्या सावंतवाडीत सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा…

आरपीडी हायस्कूल हॉलमध्ये सकाळी ११ वाजता शोकसभा; सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांना उपस्थित राहण्याचे संजू परब यांचे आवाहन..

सावंतवाडी ता.३१-: महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राज्यातील जनतेच्या हृदयातील दादा, स्पष्ट व तडकाफडकी निर्णय घेण्यात वाकबगार असलेले महाराष्ट्राचे एक वजनदार व प्रशासनावर भक्कम पकड असलेले अजातशत्रू अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी अकाली निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील सर्व पक्षीयांच्या वतीने उद्या सकाळी ११ वाजता आरपीडी हायस्कूल हॉल सावंतवाडी येथे शोक सभा आयोजित केली आहे, दिवंगत अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व पक्षीय पदाधिकारी,व कार्यकर्त्यां तसेच विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी देखील या नियोजित वेळेत उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page