रेडी जि. प. मतदारसंघाचे उमेदवार प्रितेश राऊळ यांच्या प्रचारास उस्फूर्त प्रतिसाद…

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे महायुतीचे ( भाजपचे ) उमेदवार प्रितेश शंकर राऊळ यांच्या प्रचारास भरीव प्रतिसाद मिळत आहे. रेडी पं. स. उमेदवार प्रियांका घाटवळ व शिरोडा पं. स. उमेदवार शीतल साळगावकर यांचाही प्रचारासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. रेडी प्रसिद्ध श्री गणपती मंदिर, रेडी माऊली मंदिर येथून प्रचाराचा शुभारंभ जोरदार झाला असून रेडी, शिरोडा व अन्य भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रितेश राऊळ यांच्यासह अन्य दोन उमेदवार, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ला नगरपरिषद उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी सरपंच कासकर, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, आरवली सरपंच समीर कांबळी, कौशिक परब, शिरोडा ग्रा. पं. सदस्य हेतल गावडे, धानजी, मयुरेश शिरोडकर, बाबल गावडे, अभय बर्डे, रीमा मेस्त्री, माजी सदस्य उषा मठकर आदीसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page