कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार..?: याकडे आता सर्वांचे लक्ष..
⚡सावंतवाडी ता.३०-: तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघात संजू परब यांचा उद्या दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान ते मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार असून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत.
तळवडा मतदारसंघात संजू परब यांना मानणारा मोठा कार्यकर्तावर्ग असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विशेषतः उद्या ते कार्यकर्त्यांना नेमका कोणता कानामंत्र देतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, मतदारसंघातील काही कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चाही सुरू असून त्या पार्श्वभूमीवर संजू परब यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या भेटीगाठींमधून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार का,..? याबाबत उत्सुकता आहे.
एकूणच आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने संजू परब यांचा तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघातील दौरा निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
