प्रकट वाचन स्पर्धेत दुर्वा नाटेकर व मृदुला सावंत प्रथम…

⚡बांदा ता.३१-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांमधील वाचनकौशल्य वाढावे या उद्देशाने येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रकट वाचन स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात दुर्वा नाटेकर (दिव्य ज्योती स्कुल बांदा) तर आठवी ते दहावी गटात मृदुला सावंत (दिव्य ज्योती स्कुल, बांदा) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
सावंतवाडी तालुका मर्यादित ठेवण्यात आलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण २७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या स्पर्धेची रोख रकमेची पारितोषिके सुरेश डेगवेकर पानवळ–बांदा) यांनी आपली पत्नी (कै.) सौ. सुवर्णा डेगवेकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केली होती.
इयत्ता पाचवी ते सातवी गटात प्रांजल सावंत (दिव्यज्योती हायस्कूल), अन्वयी पवार (व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदा यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या गटात धनश्री नाईक (व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदा) व समृद्धी देसाई (माध्यमिक विद्यालय, डेगवे) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
इयत्ता आठवी ते दहावी गटात अस्मी मांजरेकर (आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडी), नैतिक मोरजकर (खेमराज हायस्कूल, बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. आराध्य तेली (व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदा) व ऐश्वर्या गावडे (माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
या स्पर्धेचे परीक्षण अनंत भाटे यांनी केले. कार्यक्रमास सिद्धेश डेगवेकर, वाचनालयाचे संचालक मंडळ, शिक्षक, पालक, विद्यार्थी व वाचनालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो:-
बांदा नट वाचनालय येथे आयोजित प्रकट वाचन स्पर्धेचे उदघाटन करताना मान्यवर.

You cannot copy content of this page