Headlines

Global Maharashtra Breaking News

पुण्यातील राष्ट्रीय परिषदेत शिरगाव येथील कातळशिल्पा विषयीचा रिसर्च पेपर सादर…!

⚡देवगड ता.१५-: दोन वर्षांपुर्वी देवगड तालुक्यातील साळशी येथे उभ्या लँटराईट जातीच्या दगडावरील काही जंगली प्राण्यांची कातळचित्रे इतिहास संशोधन मंडळाच्या संशोधकांना सापडली होती. तेथून परतत असताना संध्याकाळच्या अंधारात शिरगाव येथील वाघबावली नावाच्या ठिकाणी एक नवे कातळशिल्प सापडले होते. त्या विषयीचा आपला रिसर्च पेपर पुरातत्व अभ्यासक श्री.रणजित हिर्लेकर यांनी भारतीय-मूर्तीशास्त्र आणि स्थापत्य संशोधन परिषदेच्या पाचव्या आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय…

Read More

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सिंधुदुर्गात प्राणी संग्रहालय उभारणीची मागणी…!

⚡मुंबई दि.१५-: मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सिंधुदुर्गात प्राणी संग्रहालय उभारण्याची मागणी केली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन मंत्री ना. नितेश राणे यांनी प्राणी संग्रहालय मागणीचे निवेदन दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा लाभल्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ आहे. जिल्ह्याच्या एका बाजूला समुद्र किनारा तर…

Read More

सातुळी येथे १८ रोजी जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन…!

⚡सावंतवाडी ता.१५-: सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध दशावतार हार्मोनियम वादक कै. श्री. सुभाष लक्ष्‍मण परब यांच्या स्मरणार्थ शनिवारी १८ जानेवारी रोजी सातुळी मधलीवाडी देवीचा मांड या ठिकाणी सायंकाळी ७ वाजता जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ (भोगवे) बुवा…

Read More

हा परिसर शासन मायनिंग झोन म्हणून घोषित करणार का …?

⚡देवगड ता.१४-: देवगडसारख्या पर्यटन तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील जामसंडे येथे खनिज सर्वेक्षण व संशोधन करण्याची भूमिका खनिकर्म विभाग व महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. या परिसरात मायनिंग आणण्याचा घाट महाराष्ट्र शासन करीत असून जमीन मालकांच्या जमिनी लाटण्याचा प्रकार शासन करीत आहे. रेडी, कळणेसारखे मायनिंग आणून शेतकरी, बागायतदार जमीन मालकांना देशोधडीला लावण्याचा प्रकार शासन करीत आहे. येथील संशोधनानंतर…

Read More

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ले येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न…!

⚡वेंगुर्ले ता.१४-: सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांच्या हस्ते फित कापून तसेच संत राऊळ महाराज काॅलेज कुडाळच्या प्राचार्या डाॅ. स्मिता सुरवसे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. या प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक…

Read More

सावंतवाडीत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१४-: अथायु मल्टिस्पेशालिस्ट हाॅस्पिटल कोल्हापूर व उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने सावंतवाडी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते यांचा शुभारंभ करण्यात आला. या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व अथायु मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज उपजिल्हा रुग्णालय येथे महाआरोग्य शिबिर भरवण्यात…

Read More

राजा गावडे यांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग ठेकेदार संघटना अध्यक्षपदी नियुक्ती…

⚡मालवण ता.१४-:चौके गावचे माजी सरपंच, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजन उर्फ राजा गावडे यांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग ठेकेदार संघटना अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी राजा गावडे यांना सुपूर्द केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने व शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या…

Read More

पाढे पाठांतर स्पर्धेत देवबाग हायस्कूलचे यश…

⚡मालवण ता.१४-:रोटरी क्लब मालवण आयोजित व रो.अपूर्व फर्नांडिस पुरस्कृत शालेय विद्यार्थ्यांसाठी मालवण तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेत इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी या लहान गटामध्ये देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूलचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी गंधार दत्तप्रसाद तेंडोलकर यांने तृतीय क्रमांक पटकावित यश प्राप्त केले. गंधार तेंडोलकर याच्या यशाबद्दल त्याचे व त्याच्या पालकांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ….

Read More

आमदार निलेश राणे यांच्या दणक्यानंतर मालवण नगरपरिषद प्रशासनाला आली जाग…

शहरातील समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही सुरु.. ⚡मालवण ता.१४-: मालवण शहरातील विविध समस्याबाबत नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार आमदार निलेश राणे यांनी चार दिवसांपूर्वी मालवण शहरात रात्री फिरून स्पॉट पंचनामा केल्यानंतर मालवण नगरपरिषद प्रशासनाला जाग आली आहे. मच्छिमार्केट येथील कचरा उचल करण्यासाठी दिवसभर कचरा गाडी तैनात करण्यात आली असून कचरा उचल सुरु राहणार आहे. याठिकाणी असलेल्या सेल्फी पॉईंट ठिकाणी…

Read More

निरवडे येथे बीएसएनएल टॉवरच्या कामाचे भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.१४-:निरवडे येथे बीएसएनएल टॉवरच्या कामाचे भूमिपूजन सरपंच सुहानी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यामुळे आता निरवडेत बीएसएनएलची रेंज मिळणार असल्याने मोबाईल धारकांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी सदा गावडे,संजय गावडे,लाडू गावडे, भगवान गावडे,विजय गावडे,नामदेव गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page