शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके…

⚡बांदा ता.३०-: समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सन २०२५-२६या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवी इयत्तेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार असून ही पाठ्यपुस्तके सावंतवाडी तालुक्यातील सर्व केंद्र शाळेपर्यंत पोहच करण्यात आली आहेत.
दरवर्षी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वितरण केले जाते . यापूर्वी विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठ्यपुस्तके ऐवजी प्रत्येक विषयावर पाठ्यपुस्तक मिळणार आहे. जिल्हास्तरावरून सावंतवाडी तालुक्याला प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके सावंतवाडी तालुक्यातील वीस केंद्राना वितरीत करण्यात आली असून ही पाठ्यपुस्तके आता शाळा पातळीवर वितरण केली जाणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके वितरण करण्यात येणार आहेत. पुस्तके केंद्रापर्यंत पोहोच करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर, समग्र शिक्षा विषयतज्ज्ञ, विशेष शिक्षक ,केंद्रप्रमुख यांच्या मार्फत पुस्तक वितरण नियोजन करण्यात आले आहे.बांदा केंद्रात पुस्तके ताब्यात घेतेवेळी मुख्याध्यापक शांताराम असनकर,विषयतज्ज्ञ प्रसाद सांगेलकर, विशेष शिक्षक एस. पी.तेली ,शिक्षक रमेश शिंदे, उपशिक्षक जे.डी.पाटील उपस्थित होते.

You cannot copy content of this page