कोकण विभागात बाजी मारलेल्या विभागांच्या अधिकाऱ्यांचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार…!

⚡ओरोस ता ३०-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत प्रशासनातील हिरे शोधण्याचे काम झाले आहे. अशा हिऱ्यांचा सत्कार आज करीत आहोत. आता पुढील १५० दिवसांच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम आले पाहिजे, अशी सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी १०० दिवस कार्यक्रमाअंतर्गत कोकण विभागात बाजी मारलेल्या विभागांच्या अधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात बोलताना केली.

जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करीत कोकण विभागात प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विभागांच्या अधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. हे सत्कार पालकमंत्री राणे यांच्याहस्ते प्रमाणपत्र देवून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ माणिक दिवे, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापक राजश्री सामंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page