Global Maharashtra Breaking News

लिपिक पदावर नियुक्तीसाठी जिल्हा परिषद समोर उपोषण…

ओरोस ता ९९ ऑक्टोंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ लिपिक अधिसंख्य पदावर नियुक्ती देणे बंधनकारक असतानाही देवगड तालुक्यातील एका शिक्षण संस्थेकडून त्या पदावर आपल्याला नियुक्ती दिली जात नसल्याने तसेच याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी ही दुर्लक्ष करीत असल्याने दिव्यांग व्यक्ती प्रमोद मनोहरराव सोनसुकरे यांनी आज जिल्हा परिषद समोर संस्था आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात बेमुदत साखळी आंदोलन…

Read More

सावंतवाडी येथे अभाविप अधिवेशन पोस्टर चे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते अनावरण…

⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच सावंतवाडीमध्ये होत असलेल्या ५९ व्या अखिल भारतीय विद्यार्थी परीषदअधिवेशनाचे पोस्टरचे (भित्तिपत्रक) अनावरण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,कोकण अधिवेशन समितीचे सचिव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर,अभाविप प्रदेश सहमंत्री राहुल राजोरिया यांच्या हस्ते सावंतवाडी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात करण्यात आले.कोकणात पहिल्यांदाच ५९ वे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे अधिवेशन होत…

Read More

माडखोल येथे विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू…!

⚡सावंतवाडी ता.०८-: तालुक्यातील माडखोल खळणेवाडी येथे ११ केव्ही विद्युत पोलच काम करताना कुडाळ महादेवाचे केरवडे येथील रूपेश अनंत डांगी (वय ३०) याचा शॉक लागून अपघात झाला. पोलवरून खाली कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळात त्याच निधन झालं. तालुक्यातील माडखोल येथे विद्युत पोलच काम करण्यासाठी तो युवक गेला होता….

Read More

दिगंबरा दिगंबरा… भालचंद्र बाबा दिगंबरा च्या जयघोषाने व हजारो भाविक भक्तांच्या मांदियाळीने अवघी कनकनगरी दुमदुमली…

⚡कणकवली ता.०८-: दिगंबरा दिगंबरा… भालचंद्र बाबा दिगंबरा… पायी हळूहळू चाला… मुखाने भालचंद्र बोला… अशा जयघोषाने आणि हजारो भाविक भक्तांच्या मांदियाळीने अवघी कनकनगरी दुमदुमून गेली. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी तसेच सायंकाळी ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेल्या भव्य पालखी मिरवणुकीने परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाली. पाच दिवस लाखो भाविक भक्तांनी बाबांच्या समाधीचे…

Read More

दहा तारीख ला होणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-:आ.दीपक केसरकर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिन मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेत जिल्ह्यातील सर्व हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी शालेय…

Read More

रक्तदान हेच श्रेष्ठदान…

दुर्मिळ रक्तदाता राजीव पडवळ यांनी जपली माणुसकी.. ⚡देवगड ता.०८-: शिक्षक विद्यार्थी घडवितो तर पत्रकार समाज घडवितो हे पुन्हा एकदा देवगड तालुका पत्रकार समितीचे सदस्य राजीव पडवळ यांनी दाखवून दिले.ए निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची गरज होती. मात्र जिल्हा रक्तपेढी येथे जाऊन देखील काही तांत्रिक कारणास्तव रक्तदान करता आले नाही.पण निश्चय केला तर तो सार्थकी लावायचा या…

Read More

वराडकर हायस्कूल कट्टा येथे गावठी बाजाराला उस्फूर्त प्रतिसाद…!

⚡मालवण ता.०८-: आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आठवडा गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजारात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरात, परिसरात मिळणाऱ्या विविध गावठी वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. गावठी तांदूळ, नाचणी, कुळीथ पिठी, कोकम, चिंच, सुरण, गावठी पोहे ,आगळ ,खोबरेल तेल ,वालीचे गर, गावठी अंडी, भुईमुगाच्या शेंगा, काजूगर,…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचा टिकलेश्वर ट्रेकिंग कॅम्प संपन्न…

⚡मालवण ता.०८-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख पासून ७ किलोमीटर अंतर चढावर असणाऱ्या टिकलेश्वर मंदिरापर्यंत ट्रेकिंग कॅम्प करण्यात आला. या कॅम्पमध्ये एनसीसीचे ४३ विद्यार्थी सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रेकिंग कॅम्प आयोजित…

Read More

कर्नाटक शासनाच्या दडपशाहीचा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समिती कडून निषेध….!

⚡सावंतवाडी ता.०८-: महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा प्रश्नसंदर्भात बेळगाव येथे उद्या सोमवारी अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनावर कर्नाटक शासनाने बेळगाव येथे कर्नाटकविधानसभेचे अधिवेशन होणार असल्याने बंदी आणली आहे. तसेच महाराष्ट्रातून बेळगावला येणाऱ्या नेत्यांवरही बंदी आणण्यात आली आहे. कर्नाटक शासनाच्या या दडपशाहीचा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी तीव्र शब्दात निषेध…

Read More

सालाबादप्रमाणे बस स्थानक येथीलदत्त जयंती १४ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार…

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी बस स्थानक येथील दत्त मंदीर येथे सालाबादप्रमाणे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. शनिवारी १४ डिसेंबर रोजी पहाटे श्रींची विधीवत पूजा, सायं. ५.३० वा. ह.भ.प.कांदे बुवा यांचे सुश्राव्य किर्तन, सायं. ७ वा. दत्त जन्म व त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा कष्ट भंजन मारुती पौराणीक नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच रविवारी…

Read More
You cannot copy content of this page