दांडी येथील नारळ लढवणे स्पर्धा उत्साहात…

पुरुष गटात अमन केळुसकर, महिला गटात जान्हवी लोणे विजयी..

⚡मालवण,ता.०७-:
दांडी मालवण येथे नारळी पौर्णिमा निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नारळ लढवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्पर्धकांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग दर्शवत नारळ लढवणे स्पर्धेचा मनसोक्त आनंद लुटला.
यामध्ये पुरुष गटात अमन केळुसकर व महिला गटात जान्हवी लोणे यांनी विजेतेपद पटकावले.

यावेळी ठाकरे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर आणि ज्येष्ठ शिवसैनिक दादा साटलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, तालुका समन्वयक मंदार ओरसकर, मनोज मोंडकर, शहरप्रमुख बाबी जोगी, भगवान लुडबे, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, हेमंत मोंडकर, महिला तालुका संघटक दीपा शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख नीनाक्षी मेथर उपस्थित होते.

स्पर्धेत पुरुष गटात एरॉन फर्नांडिस तर महिला गटात जान्हवी परब यांनी उपविजेते पटकावले. यावेळी उपस्थित सर्व स्पर्धकांनी चांगल्या प्रकारे स्पर्धेचे आयोजन करून स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे विशेष आभार मानले.
यावेळी दांडी शाखाप्रमुख रवी मिटकर, उपशाखाप्रमुख भूषण आचरेकर, अक्षय रेवंडकर, युवासेना विभाग प्रमुख चंदू खोबरेकर, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर, अन्वय प्रभू, महिला उपतालुका संघटक नीना मुंबरकर, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर, युवतीसेना उपशहरप्रमुख माधुरी प्रभू, जयदेव लोणे, राका रोगे, नारायण रोगे, महेश कोयंडे, अक्षय राणे, मंदा जोशी, सायली गवळी, प्रदीप मालवणकर, सुभाष मांजरेकर, दत्ता केळूसकर, सुधीर चिंदरकर, देवानंद मयेकर, भार्गव खराडे, कल्पेश रोगे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page