मालवण दि प्रतिनिधी :
स्मार्ट मिटर, सरासरी लाईटबिल, उच्च दाबाच्या वीज प्रवाहमुळे वीज ग्राहकांचे होणारे नुकसान व अन्य वीजप्रश्नी भाजपा मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी भुमिका मांडत शहरातील वीज समस्या वेळेत सोडावा, गणेश चतुर्थी पूर्वी सर्व कामे पुर्ण करा. आगामी काळात वीज पुरवठा सुरळीत राहील. पुरवठा खंडित होणार नाही या दृष्टीने नियोजन करा. अश्या सूचना देण्यात आल्या.
महायुती सरकार माध्यमातून मोठा निधी प्राप्त होत आहे. अनेक विकासकामे सुरु आहेत. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे त्यासाठी प्रयत्नशील आहेत. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार वीज विभागाने प्राधान्याने कुडाळ मालवण वीज समस्या सोडवण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी वीज विभागाने कार्यरत राहावे. असे सुदेश आचरेकर यांनी सांगितले
जुने मिटर सुस्थितीत असतील तर स्मार्ट मिटर सक्ती ग्राहकांवर करू नका. त्याच प्रमाणे वीज बिल आकरणी करताना कुलूप फोटो दाखवून सरसरी वीज बिल येणार नाही याची दक्षता घ्या. दांडी भागात उच्च दाब (440) विजमुळे ग्राहकांचे वीज उपकरणे यांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी पूर्वी माजी खासदार राऊत, माजी आमदार नाईक यांच्या काळात चुकीचे वीज वाहिन्या जोडणी झाल्यामुळे हे प्रकार होत असल्याचे सुदेश आचरेकर म्हणाले.
गणेशोत्सव लक्षात घेता आतापासून सुरळीत वीज पुरवठा राहिला पाहिजे. बाजारपेठ गणेश चित्रशाळा यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. असेही सुदेश आचरेकर बाबा मोंडकर यांनी सांगितले.
यावेळी भाजपा पदाधिकारी माजी नगरसेविका पुजा करलकर, आप्पा लुडबे, पंकज सादये, जिवन भोगावकर, प्रमोद करलकर, आबा हडकर, सुरेश बापार्डेकर, संमेश परब, मालवणकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते