श्री बांदेश्वर मंदिरात नवीन पालखी अर्पण सोहळा उत्साहात…
⚡बांदा ता.२३-: बांदा येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात नवीन पालखीचा अर्पण सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी ब्राह्मण वृंदाच्या मंत्रोच्चारात पालखीचे पूजन, मंत्र पठण, हवन, अभिषेक,शुद्धीकरण आदींसह विविध धार्मिक विधी करण्यात आले. त्यानंतर आरती होऊन गाऱ्हाणे घालण्यात आले आणि भाविकांना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले.नारळी पौर्णिमा, विजयादशमी, जत्रोत्सव, महाशिवरात्री…
