Headlines

Global Maharashtra Breaking News

खांबाळे येथे ‘श्री आई आदिष्टी देवी डेअरी’च्या दूध संकलन केंद्राचा शुभारंभ…

वैभववाडी प्रतिनिधीखांबाळे (चव्हाटेवाडी) येथे ‘श्री आई आदिष्टी देवी डेअरी’च्या दूध संकलन केंद्राचा शुभारंभ मंगळवारी (१ सप्टेंबर) पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या केंद्रामुळे परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संकलनासाठी स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध झाली आहे.हे केंद्र श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, कसबा वाळवे (घोणसरी–फोंडाघाट) यांच्याशी संलग्न आहे. या केंद्रावर…

Read Full News

सिंधुदुर्गात शनिवारी १३४ ठिकाणी दहीहंडीचा थरार…

सिंधुदुर्गनगरी ता ४सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम आज शुक्रवारी मोठ्या आनंदात पार पडला असून शनिवारी जिल्ह्यात १३४ ठिकाणी दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे. यामध्ये खाजगी ११, सार्वजनिक ११७ तर राजकीय ६ दहीहंडीचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक ठिकाणी कृष्णमूर्तीची पूजा केली जाते. जिल्ह्यात आज कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव पार…

Read Full News

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांवर आरोग्य विभागाची नजर…

सिंधुदुर्गनगरी ता ४गणेशोत्सव १४ सप्टेंबर पासून सुरू होत असून गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात साथरोगाचा फैलाव होवू नये यासाठी १० ते १३ सप्टेंबर तसेच १६ व १७ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन, बस स्थानके व चेक पोस्ट असलेल्या १८ ठिकाणी वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई…

Read Full News

१९ गुरुजनांतून आठ जण ठरले ‘आदर्श’जिल्हा शिक्षक पुरस्कारांची प्रमोद कामत यांनी केली घोषणा

ओरोस, ता. ४ :जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आठही तालुक्यांतून आलेल्या एकूण १९ प्रस्तावांमधून आठ शिक्षकांची निवड करण्यात आली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून या पुरस्कारांची घोषणा करण्यात aale असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली.यावेळी शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुबोध माने उपस्थित…

Read Full News

कणकवली सा.बां. विभागाकडुन विकास कामांचे ठेके होतायत मॅनेज…

माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप:कार्यकारी अभियंत्यांनी १७ टक्के कमी दराची निविदा रद्द करून २ टक्के कमी दराच्या निविदेला दिली मंजुरी.. ⚡कणकवली ता.०४-: तालुक्यातील शिरवल शिवडाव दारीस्ते प्रजीमा – २५ या रस्त्यावर २/४०० किमी मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे या कामासाठी ६९ लाख ४२ हजार रु. मंजूर झाले आहेत. याकामाची निविदा एका ठेकेदाराने १७ टक्के…

Read Full News

१४१ दूध संस्थांमधून बांदा पंचक्रोशी दुग्ध संस्था जिल्ह्यात अव्वल

आदर्श दूध संस्था स्पर्धेतील यशाबद्दल चेअरमन गजानन गायतोंडे यांचा सत्कार बांदा/प्रतिनिधीआदर्श दूध संस्था स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४१ दूध संस्थांमधून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बांदा पंचक्रोशी दुग्ध संस्थेचे चेअरमन गजानन गायतोंडे व संचालक राजेश पावसकर यांचा बांदा शहर विकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक व सुशांत पांगम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व…

Read Full News

NOC साठी मागितली चक्क चांदीची अंगठी..

कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात:पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप.. ⚡कुडाळ ता.०४-: व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला (NOC) देण्यासाठी १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागितल्याप्रकरणी कुडाळ नगरपंचायतीतील स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर (वय ४२, वर्ग ३) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली. शुक्रवारी (४ सप्टेंबर) दुपारी नगरपंचायत कार्यालयात…

Read Full News

इन्सुलीतील जुन्या मुंबई-गोवा महामार्गाची साफसफाईजि.प. सदस्य नितीन राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश..

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांना दिलासा.. ⚡बांदा ता.०४-: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर इन्सुली येथील जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर वाढणारी वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन रस्त्याच्या दुतर्फा साचलेला कचरा, झाडाझुडपे व वाढलेले गवत साफ करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी यासाठी संबंधित यंत्रणेकडे सातत्याने संपर्क साधून पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर रस्त्याची साफसफाई करण्यात आली.गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे तसेच…

Read Full News

आंबोली-सांगेलीच्या सह्याद्री रेस्क्यू पथकाची शर्थीची मोहीम

४०० फूट दरीतून बेपत्ता तरुणाचा मृतदेह बाहेर कुडाळ : स्वप्नवेल पॉईंट, तिलारी कॅनाल परिसरातून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा अखेर ४०० फूट खोल दरीत मृतदेह आढळून आला. गुरुवारी (३ सप्टेंबर) सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप, आंबोली-सांगेलीच्या रेस्क्यू पथकाने तब्बल नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह दरीतून बाहेर काढला.हर्षद प्रकाश हुंदळेकर (रा. पाटणे फाटा, जंगमटी) असे…

Read Full News

बांदा निमजगा अंगणवाडीत चिमुकल्यांची गोकुळाष्टमी उत्साहात

दहीहंडी फोडून बालगोपाळांचा आनंद; श्रीकृष्णाच्या वेशभूषेने वेधले लक्ष बांदा/प्रतिनिधीबांदा-निमजगा येथील अंगणवाडीत चिमुकल्या बालगोपाळांनी गोकुळाष्टमीचा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. यानिमित्त अंगणवाडी परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी श्रीकृष्णाच्या बालरूपाची अनुभूती उपस्थितांना करून दिली.गोकुळाष्टमीनिमित्त अंगणवाडीतील मुलांनी श्रीकृष्णाची आकर्षक वेशभूषा केली होती. काही चिमुकल्यांनी कृष्ण, तर काहींनी पारंपरिक वेशभूषा साकारत उत्सवात…

Read Full News

You cannot copy content of this page