Headlines

Global Maharashtra Breaking News

सरंबळ देऊळवाडी गणेशघाट आणि विकासकामांचे उद्या लोकार्पण

कुडाळ : देऊळवाडी येथील गणेशघाट तसेच देवसेवेकरींच्या पाय धुण्यासाठी उभारण्यात आलेल्या पवित्र जागेचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.या लोकार्पण सोहळ्यास आमदार निलेश राणे तसेच शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या शुभहस्ते या पवित्र स्थळाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सारंबळ देऊळवाडी येथील…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धेत कट्टा महाविद्यालयाचा धावण्याच्या स्पर्धेत योगेश ताम्हणकर हा तृतीय क्रमांक

मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी श्री. संजय आग्रे मित्र मंडळ, फोंडाघाट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धेत डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथील प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी कु. योगेश राजन ताम्हणकर याने१०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला….

Read Full News

निवती लाईट हाऊस पर्यटनावर नवा तांत्रिक पेच…

‘झोन २’चा दर्जा देण्याची विष्णू मोंडकर यांची मागणी.. ⚡मालवण, ता.०५-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगाम सुरू होत असतानाच, निवती लाईट हाऊस व ‘म्हातारीची चूळ’ परिसरात पर्यटकांना नेणाऱ्या जलक्रीडा व्यावसायिकांसमोर महाराष्ट्र सागरी मंडळाने एक नवा गंभीर तांत्रिक व कायदेशीर पेच निर्माण केला आहे. बंदर विभागाने अचानक ‘इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग’ ची नोंदणी बंधनकारक केल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये तीव्र असंतोष…

Read Full News

तांबोळीत विजेचा लपंडाव; ग्रामस्थ संतप्त

गणेशोत्सवापूर्वी वीजपुरवठा सुरळीत न केल्यास बांदा महावितरण कार्यालयावर धडक देण्याचा इशारा बांदा/प्रतिनिधीतांबोळी गावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असून, वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. काल गोकुळाष्टमीच्या दिवशीही दिवसभर वीज गायब राहिल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली. विशेषतः उपवासाचा स्वयंपाक करताना गृहिणींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर…

Read Full News

विलवडेतील सर्व क्वारी बुजवून पर्यावरणाची हानी भरून काढावी

सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; दहा दिवसांत भेट घेणार बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यातील विलवडे गावातील क्वारींमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास झाला असून, येथील सर्व क्वारी बुजवून उत्खननामुळे झालेली पर्यावरणाची हानी भरून काढावी, अशी मागणी वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी केली आहे. यासंदर्भात येत्या दहा दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे…

Read Full News

सावंतवाडीत ९ सप्टेंबरला भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी…

प्रभाकर सावंत यांची माहिती: प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणेंसह दिग्गज नेते राहणार उपस्थित.. ⚡सावंतवाडी, ता. ५-: भारतीय जनता पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक येत्या ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार…

Read Full News

कुडाळमध्ये अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा आदेश…

कुडाळ बाजारपेठ व कुडाळ-मालवण मार्गावर अवजड वाहतुकीला प्रतिबंध:एसआरएम कॉलेज–एमआयडीसी मार्गे वाहतूक वळविणार.. ⚡कुडाळ ता.०५-: गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर कुडाळ शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील अवजड वाहतूक मुख्य बाजारपेठेतून न आणता पर्यायी मार्गाने वळविण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जारी केला आहे. मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ अन्वये हा आदेश पुढील आदेश…

Read Full News

जि. प. शाळांच्या विकासासाठी अनिल निरवडेकर सरसावले; दोन शाळा घेतल्या दत्तक…

⚡सावंतवाडी ता.०५-: भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४, शाळा क्रमांक ५ दत्तक घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून निरवडेकर यांनी या शाळांमध्ये विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम हाती घेतले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली असून तळवणे…

Read Full News

१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई

सिंधुदुर्गनगरी, दि. ५ सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर लाईटचा वापर करण्यात येण्याची शक्यता असते. लेझर लाईट डोळ्यांवर पडल्याने वृद्ध व्यक्ती, लहान मुले तसेच किशोरवयीन व्यक्तींच्या डोळ्यांना इजा होऊन दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये…

Read Full News

जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सिंधुदुर्ग 05 :- जिल्ह्यात विविध आंदोलने, सण, उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ) ते (फ), ३७ (३) नुसार दिनांक – ०५ सप्टेंबर २०२६ रोजी ००.०१ ते दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी २४.०० वा पर्यत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी खालील कृत्य करण्यांस मनाई…

Read Full News

You cannot copy content of this page