Headlines

Global Maharashtra Breaking News

९ डिसेंबरला जिल्ह्यात मंदिरे, मंदिर परिसर स्वच्छता मोहीम…

स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेचे आयोजन:जिल्हा वासियांना सहभागी होण्याचे रविंद्र खेबुडकर यांचे आवाहन.. ओरोस ता ५स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 11 या कालावधीत श्रमदानाच्या माध्यमातुन मंदिरे व मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत जिल्हावसियांनी सहभाग घेऊन श्रमदान करावे असे…

Read Full News

टी ई टी सक्ती विरोधात हजारो शिक्षक आंदोलनात…

शाळा बंद ठेवून सहभाग:निर्णय बदलला नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.. ओरोस ता ५शिक्षकांच्या टी. ई. टी. सक्ती व इतर प्रलंबित प्रश्नाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ५ डिसेंबरला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने शाळा बंद ठेऊन जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले .यावेळी शासन धोरणाविरोधात जोरजोरत घोषणा देऊन परिसर दणानुन सोडला. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने…

Read Full News

सावंतवाडीत विज्ञान प्रदर्शनात राठोड सरांना तृतीय क्रमांक…

⚡सावंतवाडी ता.०५-: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती सावंतवाडी आयोजित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे संपन्न झालेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री शिवछत्रपती माध्य.विद्यालय असनिये प्रशालेचे जेष्ठ विज्ञान शिक्षक श्री. बी.टी.राठोड सर यांचा शिक्षक प्रतिकृति मध्ये सावंतवाडी तालुक्यातुन तृतीय क्रमांक आला. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रशालेतुन विद्यार्थी प्रतिकृति मध्ये इयत्ता १०वीचा विद्यार्थी कु. गोविंद सावंत…

Read Full News

ब्युटीशियन सौ. सायली मांजरेकर यांची कोकण रत्न पदवीसाठी निवड…

⚡मालवण ता.०५-:मालवण मधील ब्युटी पार्लर व्यवसायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सलील मांजरेकर यांची स्वतंत्र कोकणराज्य अभियाना तर्फे कोकण रत्न पदवीसाठी निवड करण्यात आली आहे. सौ. सायली मांजरेकर या गेली अनेक वर्षे मालवणात ब्युटीशियन म्हणून कार्यरत असून सायली ब्युटीपार्लरच्या माध्यमातून त्या शासनमान्य ब्युटीशियन कोर्स देखील घेत असून आजपर्यंत त्यांनी अनेक युवती व महिलांना ब्युटी पार्लरचे…

Read Full News

मालवणात सायकल रॅलीतून संविधान व पर्यावरण विषयी जनजागृती…

⚡मालवण ता.०५-:“नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली आम्हां महान लोकशाही’… अशा घोषणा देत युथ बीट्स फॉर क्लायमेट, अनुभव शिक्षा केंद्र, इकोमेट्स आणि वनशक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणात सायकल रॅली काढण्यात आली. मालवण भरड नाका ते वायरी-भूतनाथ मंदिर या मार्गावरून निघालेल्या या रॅलीत टोपीवाला हायस्कूल, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल आणि रोझरी इंग्लिश स्कूल या…

Read Full News

कांदळगाव येथे निमंत्रित भजन स्पर्धा…

⚡मालवण ता.०५-:कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात ग्रामदेवता प्रासादिक भजन मंडळ व कांदळगाव ग्रामस्थ यांच्यातर्फे व श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सद्‌गुरू संगीत भजन मंडळ, कुडाळ (बुवा-वैभव सावंत, पखवाज-निखील पावसकर, तबला-साई नाईक), देवी भवानी भजन मंडळ, भोगवे (बुवा-…

Read Full News

मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची ७ रोजी सभा…

⚡मालवण ता.०५-:मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे होणार आहे. तरी सर्व सदस्यांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघांचे अध्यक्ष अजित गवंडे व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.

Read Full News

सिंधुदुर्ग किल्ल्यात ‘एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ गड मोहीम संपन्न…

⚡मालवण ता.०५-:मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ ही गड मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत किल्ल्याची स्वच्छता, श्री भवानी देवीचा नामजप, गड भ्रमंती, स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून बलोपासना करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यामधील श्री शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री भवानी माता यांच्या चरणी पुष्पहार आणि…

Read Full News

मालवणात मद्यमुक्तीबाबत जानेवारीत तीन दिवसीय आरोग्य शिबीर…

⚡मालवण ता.०५-:अति दारु पिणाऱ्या व्यक्तींना दारु पिण्याच्या सवयीपासुन परावृत्त करून समाजात चांगले जीवन जगण्याचा मार्ग दाखविणाऱ्या व गेली २५ वर्षे मालवण मध्ये विनामुल्य कार्य करणाऱ्या अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (अनामिक मद्यपी संघटना) मालवण या संस्थेचा २५ वा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त शासकिय ग्रामिण रुग्णालय मालवण येथे ३ दिवसीय मोफत आरोग्य शिबिर (डिटॉक्स कॅम्प) दि. ७,…

Read Full News

निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप होण स्वाभाविक, मात्र, महायुतीमध्ये आम्ही एकत्रित सत्तेत आहोत…

रवींद्र चव्हाण:राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच सरकार गतीमान पद्धतीने काम करतय.. ⚡सावंतवाडी ता.०५-: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप होण स्वाभाविक आहे. मात्र, महायुतीमध्ये आम्ही एकत्रित सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेसाठी २०२९ पर्यंत राज्य व केंद्र सरकार सुरळीतपणे चालावं अशी धारणा आमची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीतील नेत्यांशी चर्चा झाली. घडलेल्या…

Read Full News

You cannot copy content of this page