कांदळगाव येथे निमंत्रित भजन स्पर्धा…

⚡मालवण ता.०५-:
कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात ग्रामदेवता प्रासादिक भजन मंडळ व कांदळगाव ग्रामस्थ यांच्यातर्फे व श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत सद्‌गुरू संगीत भजन मंडळ, कुडाळ (बुवा-वैभव सावंत, पखवाज-निखील पावसकर, तबला-साई नाईक), देवी भवानी भजन मंडळ, भोगवे (बुवा- मदन करलकर, पखवाज-केतन नेवाळकर, तबला-राजाराम परुळेकर), महापुरुष भजन मंडळ, पिंगुळी (बुवा-प्रसाद आमडोसकर, पखवाज-प्रथमेश राणे, तबला साईप्रसाद नाईक), हरिओम भजन मंडळ, कुणकवळे (बुवा-तन्मय परब, पखवाज-बबन मेस्त्री, तबला-संतोष महाभोज), सिद्धिविनायक भजन मंडळ, कणकवली (बुवा-दुर्गेश मिठबावकर, पखवाज-चिन्मय माधव, तबला-सोहम राणे), देव रवळनाथ भजन मंडळ, पिंगुळी (बुवा-रुपेश यमकर, पखवाज-तुषार कोंडुरकर, तबला-अमन सातार्डेकर) यांची भजने होणार आहेत. भजन प्रेमीनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ग्रामदेवता प्रासादिक भजन मंडळ, कांदळगाव व ग्रामस्थ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page