जि .प. शिक्षण विभागाने निवृत्त शिक्षकांचे प्रश्न वेळीच सोडवावेत अन्यथा उपोषणास बसू…

सावळाराम अणावकर:मालवणात सेवानिवृत्त शिक्षकांचा आनंद मेळावा संपन्न..

⚡मालवण ता.०७-:
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना अनेक वेळा निवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांबाबत निवेदन दिल्यावर प्रत्येक वेळी आश्वासने मिळाल्याने आंदोलने मागे घेण्यात आली. आता पुन्हा निवेदन दिले असून यावेळी जर प्रश्न सोडविले गेले नाहीत तर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी दिला आहे

कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालयात मालवण तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथ. शिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि कुटुंबवेतन धारक यांचा आनंद मेळावा मालवण तालुका अध्यक्ष विजय चौकेकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी सावळाराम अणावकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका अध्यक्ष विजय चौकेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दळवी, ना. य. सावंत, जिल्हा सरचिटणीस सुंदर पारकर, जिल्हा सदस्य कृष्णा पाताडे, सरिता मुननकर, रुद्राजी भालेकर आणि मनोहर जोगल, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष झिलू गोसावी, कणकवली तालुकाध्यक्ष शंकर बागवे, माजी तालुकाअध्यक्ष चंद्रकांत तेली, माजी सचिव अनिल मालवदे, उपाध्यक्ष शिवराम सुतार, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रामनाथ राऊळ, देवगड तालुकाध्यक्ष मधुकर राणे, सचिव रावजी परब, सेवानिवृत्त सैनिक मधुसुदन सारंग आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर सचिव अरुण गोसावी यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात विजय चौकेकर यांनी शिक्षकांनी आनंदी आणि समाधानी कसे रहावे, या विषयी मार्गदर्शन करताना तणावमुक्त आणि आनंदी राहण्यासाठी काय करावे हे स्पष्ट केले यावेळी मालवण तालुक्यातील ५८ वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना गुरुवर्य जीवनसाधना पुरस्कार तसेच वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या शिक्षकांना अमृतमहोत्सवी शिक्षण तपस्वी पुरस्कार प्रदान करताना त्यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, ग्रंथभेट आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विजय चौकेकर, सदानंद कांबळी, दिपक पाताडे, कृष्णा गोसावी, सुगंधा गुरव, चंद्रकांत कदम यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले

यावेळी श्रीकृष्ण पाडगांवकर, प्रकाश दळवी, ना .य . सावंत, सुंदर पारकर झिलू गोसावी, शंकर बागवे, मधुकर राणे, रामनाथ राऊळ सुंदर पारकर यांची समायोचित भाषणे झाली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुगंधा गुरव यांनी केले तर आभार रामचंद्र वाळके यांनी मानले.

You cannot copy content of this page