Headlines

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मालवणात कथावाचन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.०७-:
मालवण येथील बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर मालवण यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कथावाचन कार्यक्रमाला श्रोत्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला

प्रारंभी साने गुरुजींच्या “खरा तो एकची धर्म” या प्रार्थना सादर करण्यात आल्यानंतर मराठी गौरव गीत सादर केले गेले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ साहित्यिक श्रीमती वैशाली पंडित यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सेवांगण संस्थेचे कार्यवाह श्री लक्ष्मीकांत खोबरेकर , साने गुरुजी वाचन मंदिर मालवण च्या सदस्य सौ.स्नेहा साटलकर, व्यवस्थापक श्री संजय आचरेकर उपस्थित होते.
यावेळी श्री योगेश मुणगेकर यांनी “धिरोदत्त सुधा, “कु. वैश्विका कदम हिने “कविता”, सौ.रमा पराडकर यांनी “समाधी, “श्री.दिलीप रेडकर यांनी “सखी, “कु.मैत्रेयी बांदेकर यांनी “होणारे न टळेल ” अशा कथा सादर केल्या .श्री नितीन वाळके यांनी “तो मला दिसला “या कथांचे वाचन केले. कार्यक्रमाच्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्रीमती वैशाली पंडित यांनी सर्व कथा वाचकांना त्यांच्या कथा वाचनाबद्दल मोलाचे मार्गदर्शन करीत ‘आगीन झाड’ या आपल्या कथासंग्रहातील “बोजा ” या कथेचं आपल्या शैलीत वाचन केलं. सहभागी कथा वाचकांना ग्रंथ भेट आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला डॉ.सौ.सुमेधा नाईक, श्री संग्राम कासले, सौ. वैष्णवी आचरेकर, श्रीमती सोनाली कोळंबकर, श्रीमती तेजस्विनी पाताडे,सौ.आनंदी घोगळे,श्री रेकोबा हायस्कूल, जय गणेश इंग्लिश स्कूल आणि सुनिता देवी अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षकवृंद आणि श्रोते उपस्थित होते. उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना ग्रंथभेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथालय सहाय्यक कु.गौरी केळुसकर आणि सेवांगण कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page